शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

22 जागा नकोत, 22 बूथ जिंकून दाखवा; अमित शाह यांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 14:05 IST

भाजपाने आज मुगलसरायचे नाव बदलले कदाचित लाल किल्ल्याचेही नाव बदलतील असे म्हणत एनआरसीच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

कोलकाता- पश्चिम बंगाल राज्यात तृणमूल काँग्रेसला आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पूर्ण तयारीने निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी लोकसभेच्या येत्या निवडणुकीत बंगालमध्ये 22 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्रिपुरा विधानसभेत भरघोस यश मिळाल्यानंतर भाजपाने आपली सगळी ताकद पश्चिम बंगालमध्ये लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र येथे तृणमूल काँग्रेसने भाजपाला तितकेच आक्रमक प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांनी आतापासूनच एकमेकांवर आरोप करायला आव्हाने द्यायला सुरुवात केली आहे.पश्चिम बंगालमध्ये 22 पेक्षा अधिक जागां जिंकण्याचा निर्धार करणाऱ्या अमित शाह यांना ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना आव्हान दिले आहे. 22 जागाच काय 22 बूथ तरी जिंकून दाखवा असे मी आव्हान तुम्हाला देतो असे बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील एका सभेत वक्तव्य केले.  या सभेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही संबोधित केले. नोटाबंदीमुळे नक्की काय झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रुपया अगदीच घसरला आहे. जंगलमहलमध्ये काही जागा काय जिंकल्या या लोकांनी हिंसेचे राजकारण सुरु केले आहे अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये सीपीआय पक्षासाठी धमक्या देण्याचे काम करायचे आता ते भाजपाच्या ताब्यात गेले आहेत. पंचायत निवडणुकांमध्ये मतदारांच्या रांगांमध्ये बीएसएफ घुसले होते असा आरोप ममता यांनी केला आहे. उत्तर प्रदेशात एन्काउंटरच्या नावाखाली लोकांना मारणे सुरु आहे. इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला विसरुन जा, आज लोकांना आपला धर्म निवडण्याचाही अधिकार उरलेला नाही. हे लोक इतिहास मिटवण्याचा प्रय्तन करत आहेत असा आरोप ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केला. भाजपाने आज मुगलसरायचे नाव बदलले कदाचित लाल किल्ल्याचेही नाव बदलतील असे म्हणत एनआरसीच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

टॅग्स :Amit Shahअमित शाहtmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल