२२ तलाठ्यांच्या वेतनवाढी रोखल्या कामात हलगर्जीपणा : तलाठ्यांनी पुकारला असहकार
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:26+5:302015-01-23T23:06:26+5:30
पाथर्डी : कामात हलगर्जीपणा करणार्या २२ तलाठ्यांच्या वेतनवाढी रोखण्याचा आदेश तहसीलदारांनी काढला आहे़ त्यामुळे तालुक्यातील तलाठ्यांमध्ये खळबळ उडाली असून, तहसीलदारांनी हा आदेश मागे घ्यावा अन्यथा असहकाराचे हत्यार उपसण्याचा इशारा तलाठ्यांनी दिला आहे़ त्यामुळे तहसीलदार विरुद्ध तलाठी असा कलगीतुरा तालुक्यात रंगला आहे़

२२ तलाठ्यांच्या वेतनवाढी रोखल्या कामात हलगर्जीपणा : तलाठ्यांनी पुकारला असहकार
प थर्डी : कामात हलगर्जीपणा करणार्या २२ तलाठ्यांच्या वेतनवाढी रोखण्याचा आदेश तहसीलदारांनी काढला आहे़ त्यामुळे तालुक्यातील तलाठ्यांमध्ये खळबळ उडाली असून, तहसीलदारांनी हा आदेश मागे घ्यावा अन्यथा असहकाराचे हत्यार उपसण्याचा इशारा तलाठ्यांनी दिला आहे़ त्यामुळे तहसीलदार विरुद्ध तलाठी असा कलगीतुरा तालुक्यात रंगला आहे़शासनाने सातबारा संगणकीकरणाचे काम हाती घेतले होते. या कामात अनेक तलाठ्यांनी दिरंगाई केली होती. याला जबाबदार धरुन प्रांताधिकारी कार्यालयाने तहसीलदारांना नोटीस बजावली होती.तसेच दुष्काळी भागातील शेतकर्यांना अनुदान देण्यासाठीची माहिती शासनाने मागितली होती़ ही माहितीसुद्धा काही तलाठ्यांनी वेळेत दिली नव्हती़ ही माहिती तयार करण्यात तहसील कार्यालयाला चांगलाच द्रविडी प्राणायाम करायला लागला होता. तसेच तहसील कार्यालयाला ३ कोटी ५६ लाख रुपयांचे शासकीय वसुलीचे उद्दिष्ट असताना आतापर्यत केवळ २२ टक्के वसुली झाली आहे. अनेक तलाठ्यांची दप्तरे अपूर्ण आहे़ तसेच तालुक्यात वाळू व गौणखनिजांचा बेकायदा उपसा करुन साठे केले आहेत़ त्यावर कारवाई करण्यास तलाठ्यांनी उदासिनता दाखविली़ या सर्व बाबी लक्षात घेवून तहसीलदार सुभाष भाटे यांनी तालुक्यातील २२ कामगार तलाठ्यांची वेतनवाढ रोखण्याचा आदेश डिसेंबर २०१४ मध्ये दिला़ तहसीलदारांनी केलेल्या कारवाईमुळे तलाठी संघटनेने तहसील व प्रांताधिकारी यांच्या शासकीय बैठकांवर बहिष्कार घालित कोणतीही माहिती न पुरविण्याचा निर्णय घेतला आहे़ तलाठ्यांच्या या असहकार आंदोलनाने मोठा पेच निर्माण झाला आहे.़़़़़़़़़़़़़यामुळे केली तहसीलदारांवर कारवाईसातबारा संगणकीकरणाच्या कामात हलगर्जीपणा करणे,वसुलीबाबत उदासीनता दाखविणे, बेकायदा गौणखनिज व वाळू उपसा करुन साठे करणार्यांवर कारवाई न करणे, वेळेत माहिती उपलब्ध करुन न देणे आदी कारणावरून तालुक्यातील २२ कामगार तलाठ्यांच्या वेतनवाढी रोखण्याचा आदेश तहसीलदारांनी काढला आहे़़़़़़़तलाठी संघटनेकडून बहिष्कार टाक णार असल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही. - सुभाष भाटे, तहसीलदाऱ़़़़़़़तहसीलदारांनी २२ कामगार तलाठ्यांवर वेतनवाढ रोखण्याची केलेली कारवाई अन्यायकारक असून ही कारवाई मागे घ्यावी़ अन्यथा आम्ही बहिष्कार कायम ठेवू़ -वैभव देशमुख, उपाध्यक्ष,कामगार तलाठी संघटना