२२... गुन्हे... जोड
By Admin | Updated: January 23, 2015 01:03 IST2015-01-23T01:03:39+5:302015-01-23T01:03:39+5:30
ट्रकच्या कॅबिनमधून रोख पळविली

२२... गुन्हे... जोड
ट रकच्या कॅबिनमधून रोख पळविलीनागपूर : ट्रकच्या कॅबिनमध्ये झोपलेल्या ट्रकचालकाच्या खिशातून चोरट्यांनी रोख रक्कम पळविल्याची घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनसर शिवारात बुधवारी मध्यरात्री घडली.नागपूर-जबलपूर महामार्गावरील मनसर शिवारात जयस्वाल ढाबा आहे. फिर्यादी पवनकुमार बिरबलसिंह बघेल (२६, रा. बदनपूर, उत्तर प्रदेश) याने त्याचा आरजे-११/जेए-०८१० क्रमांकाचा ट्रक जयस्वाल ढाब्याजवळ उभ केला आणि तो ट्रकच्या कॅबिनमध्ये झोपी गेला. दरम्यान, अज्ञात चोरट्याने या कॅबिनमध्ये प्रवेश करून त्याच्या खिशातील २५ हजार रुपये रोख काढून पळ काढला. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि ३३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.***अनोळखी मृतदेह आढळलानागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गवसी मानापूर शिवारात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. सदर व्यक्तीचे वय ४५ ते ५० च्या आसपास असून, उंची १६५ से.मी. आहे. वर्ण सावळा असून, त्याने पांढरा शर्ट व कथ्था पॅन्ट परिधान केला आहे. सदर व्यक्तीस ओळखणाऱ्यांनी हिंगणा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. ***