२२... देशीकका
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:54+5:302015-01-23T01:05:54+5:30
(फोटो)

२२... देशीकका
(फ ोटो)देशीकट्टा व काडतूूस जप्तआरोपीस अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईनागपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कामठी शहरातील अब्दुलशहा दर्गा परिसरात केलेल्या कारवाईत अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्यास अटक केली. त्याच्याजवळून एक देशीकट्टा आणि काडतूस जप्त केले. ही कारवाई बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. सागर राजेंद्र कांबळे (१९, रा. श्यामनगर, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याच्या तपासासाठी कामठी शहरातून जात असताना पथकातील अधिकाऱ्यांना कामठी शहरात अवैधरीत्या देशीकट्टा बाळगला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. दरम्यान, कामठी शहरातील अब्दुलशहा दर्गा परिसरात या पथकातील अधिकाऱ्यांना सदर आरोपी आढळून आला.पोलिसांनी संशयाच्या बळावर त्याला ताब्यशत घेतले आणि त्याची कसून झडती घेतली. यात त्याच्याजवळ देशीकट्टा व काडतूस असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी लगेच त्याला अटक केली. सदर देशीकट्टा व काडतुसांची किंमत २० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमध्ये रोख रकमेसह एकूण २५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.या कारवाईमुळे शहरातील अवैधरीत्या शस्त्र बाळगून नागरिकांत दहशत निर्माण करणाऱ्यांमध्ये वचक निर्माण होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपीस कामठी पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी कामठी पोलिसांनी आर्म ॲक्ट ४, २५ अन्वये गुन्हा नेांदवून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, सुरेश गाते, जमाल, राशिद शेख, राधेश्याम कांबळे, वसंता चुटे आदींनी बजावली. (प्रतिनिधी)***