शेतकर्यांसाठी दुष्काळाचे २१६ कोटी बँकेत जमा
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:28+5:302015-02-18T00:13:28+5:30
जिल्ात १५७५ गावांमधील शेतकरी दुष्काळाने बाधीत झाले आहेत़ या शेतकर्यांना शासनाने अनुदानाची घोषणा केली आहे़ त्यात दोन टप्प्यात जिल्ासाठी २१६ कोटी ९९ लाख रूपये प्राप्त झाले आहेत़ हे अनुदान बँकेत जमा करण्यात आले असून शेतकर्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़

शेतकर्यांसाठी दुष्काळाचे २१६ कोटी बँकेत जमा
ज ल्ात १५७५ गावांमधील शेतकरी दुष्काळाने बाधीत झाले आहेत़ या शेतकर्यांना शासनाने अनुदानाची घोषणा केली आहे़ त्यात दोन टप्प्यात जिल्ासाठी २१६ कोटी ९९ लाख रूपये प्राप्त झाले आहेत़ हे अनुदान बँकेत जमा करण्यात आले असून शेतकर्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़जिल्ात यंदा अपुर्या पावसामुळे ७ लाख ४६ हजार ६०० हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके बाधीत झाली आहेत़ जवळपास ६ लाख ९७ हजार ४२ शेतकर्यांना दुष्काळाचा फटका बसला़ जिल्ात या बाधीत शेतकर्यांना दोन टप्प्यात अनुदान प्राप्त झाले आहे़ त्यात पहिल्या टप्प्यात १३२ कोटी ८७ लाख आणि दुसर्या टप्प्यात १३२ कोटी ९१ लाख रूपये प्राप्त झाले आहे़ प्राप्त अनुदानातून १२२१ गावातील ४ लाख ९५ हजार ३९७ शेतकर्यांसाठी बँकेमध्ये रक्कम वर्ग करण्यात आली आहे़ दुष्काळाच्या अनुदानापैकी आणखी ४८ कोटी ७८ लाख रूपये प्राप्त होणे शिल्लक आहेत़ ही रक्कमही लवकरच उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले़