बस अपघातात २१ प्रवासी ठार
By Admin | Updated: May 11, 2015 23:43 IST2015-05-11T23:43:10+5:302015-05-11T23:43:10+5:30
जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात सोमवारी प्रवाशांनी खच्चून भरलेली एक बस खोल दरीत कोसळल्याने घडलेल्या भीषण अपघातात २१ जण ठार

बस अपघातात २१ प्रवासी ठार
उधमपूर : जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात सोमवारी प्रवाशांनी खच्चून भरलेली एक बस खोल दरीत कोसळल्याने घडलेल्या भीषण अपघातात २१ जण ठार आणि ३० जखमी झाले. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ही बस लत्ती बेल्ट येथून उधमपूरकडे जात होती. हा अपघात एवढा भीषण होता की, बसमधील २१ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)