शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तीन राज्यांचे मुख्यमंत्री आज घेणार शपथ, सोहळ्यासाठी २१ पक्षांचे नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 07:12 IST

तीन मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी : राहुल गांधी, शरद पवार, देवेगौडा, येचुरींचीही उपस्थिती

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी १७ डिसेंबर रोजी होत असून, २१ विरोधी पक्षांचे नेते या तिन्ही शपथविधी समारंभांना उपस्थित राहणार असल्यामुळे विरोधकांच्या ऐक्याचे नवे पर्व आकार घेईल. सध्या या विरोधी पक्षांचा गट जी-२१ नावाने ओळखला जात असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार आगामी लोकसभा निवडणुकीत खाली खेचण्यासाठी हा एकत्र आला आहे. राजकारणात अस्पृश्य असलेल्या आम आदमी पक्षाला (आप) काँग्रेसने या शपथविधी समारंभांसाठी औपचारिक निमंत्रण दिले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू, जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी हे त्यांचे वडील एच.डी. देवेगौडा यांच्यासह या तिन्ही शपथविधींना उपस्थित राहतील.

अशोक गेहलोत जयपूरमध्ये सकाळी १०.३० वाजता, तर कमलनाथ भोपाळमध्ये दुपारी १.३० वाजता व रायपूरमध्ये भूपेश बघेल हे सायंकाळी ४.३० ते ५ वाजेदरम्यान मुख्ममंत्रीपदाची शपथ घेतील. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह शरद पवार, प्रफुल्ल पटेल, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा आणि इतर नेते तिन्ही शपथविधींना चार्टर्ड विमानांनी हजर राहतील. बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी शपथविधींना हजर राहण्यास आपली असमर्थता व्यक्त केली. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव लखनौमध्ये असतील. मायावती व यादव यांच्या पक्षांनी मध्यप्रदेशमध्ये विनाअट पाठिंबा दिला होता. भोपाळमधील शपथविधीला या दोघांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेत्या सोनिया गांधी या प्रकृतीच्या कारणांमुळे हजर राहणार नाहीत.विरोधी पक्षांच्या एकजुटीचा विजयच्द्रमुकचे एम.के. स्टालिन हे तिन्ही ठिकाणी हजर राहतील. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासह काँग्रेसचे सगळे मुख्यमंत्री आणि इतर नेते शपथविधी समारंभांना उपस्थित राहतील. काँग्रेसला शपथविधी समारंभांच्या माध्यमातून हे दाखवायचे आहे की, हा विरोधी पक्षांचा विजय आहे. बसप आणि समाजवादी पक्षाने सरकारमध्ये सहभागी व्हावे असा काँग्रेसचा जोरदार प्रयत्न आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018