ओदिशामध्ये २१ नक्षलवाद्यांचा खात्मा
By Admin | Updated: October 24, 2016 13:00 IST2016-10-24T09:33:11+5:302016-10-24T13:00:19+5:30
ओदिशा - आंध्रप्रदेशच्या सीमेनजीक असलेल्या मलकनगरी भागात सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत २१ नक्षलवादी ठार झाले

ओदिशामध्ये २१ नक्षलवाद्यांचा खात्मा
ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. २४ - ओदिशा - आंध्रप्रदेशच्या सीमेनजीक असलेल्या मलकनगरी भागात सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत २१ नक्षलवादी ठार झाले आहेत. ओदिशा पोलिस व आंध्र प्रदेशमधील ग्रेहाऊंडच्या जवानांनी संयुक्त कारवाई करत नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
चकमकीत मारले गेलेल्यांमध्ये माओवाद्यांच्या प्रमुख नेत्यांपैकी एक तसेच आणखी एका नेत्याच्या मुलाचा समावेश असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान या चकमकीत दोन पोलिसही जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
सोमवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षा दलाचे जवान शोधमोहिम राबवत असताना काही माओवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देत २१ माओवाद्यांना कंठस्नान घातले मात्र त्यामध्ये माओवाद्यांविरोधात काम करणा-या ग्रेहाऊंड दलाचे दोन जवान जखमी झाले. या चकमकीनंतर पोलिसांनी ४ एके-४७ रायफल्स जप्त केल्या.
दरम्यान त्याच भागात आणखी काही माओवादी लपल्याचे खबर असून शोधमोहिम अद्याप सुरूच असल्याची माहिती पोलिस अधिका-यांनी दिली.