शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या रॅलीतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 4 दोषींना फाशी, दोघांना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 18:58 IST

बिहारच्या पाटणा येथील गांधी मैदानावर 27 ऑक्टोबर 2013 नरेंद्र मोदींच्या रॅलीत साखळी बॉम्बस्फोट झाला होता.

पाटणा: 2013 मध्ये पाटणा येथील गांधी मैदानात नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीदरम्यान झालेल्या सीरियल बॉम्बस्फोटप्रकरणी (Patna Gandhi Maidan Serial Blast) न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. पाटणाच्या NIA कोर्टाने सोमवारी गांधी मैदान साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 4 आरोपींना फाशीची, 2 आरोपींना जन्मठेपेची, 2 आरोपींना 10 वर्षांची आणि एका आरोपीला 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय एका आरोपीला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आलं.

एनआयएचे विशेष न्यायाधीश गुरविंदर मल्होत्रा ​​यांनी इम्तियाज अन्सारी, मुजिबुल्ला, हैदर अली, फिरोज अस्लम, नोमन अन्सारी, इफ्तिखार, अहमद हुसैन, उमर सिद्दीकी आणि अझरुद्दीन यांना 2013 च्या गांधी मैदान साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवले. तर फखरुद्दीनला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलं. या प्रकरणी एनआयएने 11 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं, त्यापैकी एका आरोपीचे वय कमी असल्याने हा खटला बाल न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार उर्वरित दहा आरोपींविरुद्ध एनआयए न्यायालयात खटला सुरू होता.

काय आहे प्रकरण ?बिहराच्या पाटणा येथील गांधी मैदानावर 27 ऑक्टोबर 2013 रोजी झालेल्या भाजपच्या हुंकार रॅलीचे प्रमुख वक्ते नरेंद्र मोदी, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या सभेद भाजपचे इतर मोठे नेतेही उपस्थित होते. त्यावेळी मैदानात एका पाठोपाठ एक बॉम्बस्फोटांची मालिका घडली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर 90 जण जखमी झाले. हैदर अली आणि मुजिबुल्ला हे गांधी मैदान बॉम्बस्फोटाचे सूत्रधार होता. एनआयएने आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता इम्तियाजने अनेक नावे सांगितली. त्यानंतर तपास यंत्रणेने बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाइंडसह दोन डझनहून अधिक दहशतवाद्यांना पकडले. या चौकशीत बोधगया बॉम्बस्फोट प्रकरणाबद्दलही मोठी माहिती समोर आली.

टॅग्स :Biharबिहारpatna-sahib-pcपटना साहिबBombsस्फोटकेNarendra Modiनरेंद्र मोदी