शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : अखेर निर्भयाच्या गुन्हेगारांच्या मृत्युदंडाची वेळ ठरली, 22 जानेवारीला लटकवणार फासावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 17:09 IST

Nirbhaya Case : कायद्यातील तरतुदींचा फायदा घेत वारंवार फाशीच्या शिक्षेला हुलकावणी देणाऱ्या निर्भयाच्या गुन्हेगारांच्या मृत्युदंडाची तारीख निश्चित झाली आहे.

नवी दिल्ली - कायद्यातील तरतुदींचा फायदा घेत वारंवार फाशीच्या शिक्षेला हुलकावणी देणाऱ्या निर्भयाच्या गुन्हेगारांच्या मृत्युदंडाची तारीख निश्चित झाली आहे. पतियाळा हाऊस कोर्टाने आज झालेल्या सुनावणीत आरोपींचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावत त्यांच्या डेथ वॉरंटवर शिक्कामोर्तब केले आहे. त्याबरोबरच निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही क्रूर गुन्हेगारांच्या मृत्यूची वेळ निश्चित झाली असून, त्यांना 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता फासावर लटकवण्यात येईल. 

२०१२ च्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या पालकांनी या प्रकरणात दोषी ठरलेल्या ४ जणांना फाशी देण्याची प्रक्रिया त्वरेने करावी तसेच त्यांच्याविरोधात लवकरात लवकर डेथ वॉरंट काढावे, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने निकाल दिला.  आज निकाल देताना कोर्टाने आरोपींचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावत त्यांच्या डेथ वॉरंटवर शिक्कामोर्तब केले. तसेच अक्षय ठाकूर, पवन गुप्ता, मुकेश सिंह, विनय शर्मा या चारही दोषींना 22 जानेवारी रोजी सकाळा 7 वाजता फाशी देण्यात येईल, असा निकाल दिला. तसेच दोषींना या निकालाविरोधात कायदेशीर मदत घेण्यासाठी 14 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. दरम्यान, या निकालाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात  क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार असल्याचे दोषींच्या वकिलांनी सांगितले आहे. 

दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रात्री निर्भयावर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करून जबर जखमी अवस्थेत बसमधू बाहेर फेकण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर सिंगापूर येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. या बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. तसेच आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. 

दरम्यान, तिहार कारागृहात निर्भया सामूहिक बलात्कारात चार दोषींना फाशीची शिक्षा देण्यासाठी तयारी यापूर्वीच केली आहे. निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना एकत्र फाशी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येणार आहे.  तिहार कारागृहाच्या आत तख्त तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी)  नुकतेच पूर्ण केले आहे. 

 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी