शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
5
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
6
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
7
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
8
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
9
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
10
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
11
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
12
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
13
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
14
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
15
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
16
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
17
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
18
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
19
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट

2002 Gujarat Riots: 2002 गुजरात दंगल; पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्लीन चिट कायम, SC ने फेटाळली झाकिया जाफरी यांची याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 12:12 IST

2002 Gujarat Riots: 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देणाऱ्या एसआयटीच्या अहवालाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. यात मोदींना दिलेली क्लीन चिट कायम ठेवली आहे.

2002 Gujarat Riots: 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देणाऱ्या एसआयटीच्या अहवालाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दिलेली क्लीन चिट कायम ठेवली आहे. एसआयटीच्या क्लीन चिटला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी मिळाली आहे. न्यायालयाने काँग्रेसच्या दिवंगत नेत्या झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळली आहे.  गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली होती. याप्रकरणी न्यायमूर्ती एएम खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. झाकिया जाफरी यांच्या याचिकेवर मॅरेथॉन सुनावणी पूर्ण केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सात महिन्यांपूर्वी म्हणजेच, 9 डिसेंबर 2021 रोजी निर्णय राखून ठेवला होता. 

दंगलीत एहसान जाफरी यांचा मृत्यू झाला2002 च्या गुजरात दंगलीत झाकिया जाफरी यांचे पती आणि तत्कालीन काँग्रेस खासदार एहसान जाफरी यांची दंगलखोर जमावाने हत्या केली होती. गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटी हत्याकांडात एहसान जाफरी यांचीही हत्या झाली होती. एहसान जाफरी यांची विधवा झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून एसआयटीच्या अहवालाला आव्हान दिले होते.

अधिकाऱ्यांचा हात नसल्याचे स्पष्टएसआयटीच्या अहवालात राज्यात मोठ्या पदावर असलेल्या लोकांना क्लीन चिट देण्यात आली होती. एसआयटीने गोध्रा ट्रेन आगीची घटना आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीला भडकावण्याचा राज्यातील उच्च अधिकार्‍यांचा कोणताही कट असण्याची शक्यता नाकारली होती. 2017 मध्ये, गुजरात हायकोर्टाने एसआयटीच्या क्लोजर रिपोर्टविरुद्ध झाकियाची तक्रार फेटाळली. गुजरात उच्च न्यायालयाने एसआयटीच्या अहवालाला आव्हान देणारी याचिका फेटाळल्यानंतर झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयानेही ती फेटाळून लावली आहे.

काय प्रकरण आहे?हे संपूर्ण प्रकरण 28 फेब्रुवारी 2002 रोजी अहमदाबादच्या गुलबर्गा सोसायटीमध्ये झालेल्या दंगलीशी संबंधित आहे. येथील अपार्टमेंटमधील जाळपोळीत काँग्रेस खासदार एहसान जाफरी यांच्यासह 68 जणांचा मृत्यू झाला होता. एसआयटीने दंगलीचा तपास केला. तपासानंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्यात आली होती. त्या घटनेच्या दोन दिवसांपूर्वी गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागल्याने अहमदाबादसह गुजरातमधील अनेक शहरांमध्ये दंगली उसळल्या, ज्यात 59 जणांना जिवंत जाळण्यात आले. हे लोक अयोध्येहून कारसेवा करून परतत होते.

टॅग्स :Gujarat Riots 2002गुजरात दंगल 2002Narendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय