चीनच्या सीमेलगत बांधणार २,०००किमी लांब रस्ता
By Admin | Updated: October 16, 2014 08:12 IST2014-10-16T08:12:42+5:302014-10-16T08:12:42+5:30
चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अरुणाचल लगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाच्या इतिहासातील सर्वात महागडा रस्ता बांधण्याची भारताची योजना आहे.

चीनच्या सीमेलगत बांधणार २,०००किमी लांब रस्ता
इटानगर, चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अरुणाचल लगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाच्या इतिहासातील सर्वात महागडा रस्ता बांधण्याची भारताची योजना आहे. चांगलांग जिल्ह्यातील विजय नगर ते तवांग जिल्ह्यातील मागोथिंगबू हा भाग रस्त्याने जोडला जाईल. या रस्त्यामुळे सीमा भागातून होणा-या मोठ्या प्रमाणातील स्थलांतराला आळा घातला जाईल. या भागातील लोकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांना मुलभुत सुविधा पुरवल्या जातील. असे केंद्रीय गृहराज्य मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.
सीमेलगत २००० किमी. चा रस्ता बांधण्याची योजना असून या भागातील विकासाला गती देण्यासह सुरक्षेसाठी त्याचा लाभ होईल. लाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आसाम वगळता ईशान्येकडील राज्यांतील रस्तेप्रकल्पावर निगराणी ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. भैरवकुंड हा मार्ग पूर्व सियांग जिल्ह्यातील रकसीनला जोडला गेला असून तो भूतान, आसाम आणि अरुणाचल या तीन प्रदेशांमधील दुवा ठरतो. या मार्गाखेरीज नवा मार्ग बांधण्यात आल्यास अरुणाचलच्या पर्वतीय भागातील लोकांना औद्योगिक काॅरिडर उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.