शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

"शिवसेनेचे नाव आणि चिन्ह मिळविण्यासाठी 2,000 कोटी रुपये खर्च केले"; दिल्ली उच्च न्यायालयात राऊतांचा यू टर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 13:34 IST

"आपण, भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) 2000 कोटी रुपये दिले असल्याचे कोणतेही विधान केलेले नाही."

शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी फेब्रुवारी महिन्यात, शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळविण्यासाठी 2,000 कोटी रुपये खर्च केले गेल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर, त्यांच्यावर दिवाणी मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. यानंतर आता, खोटे गुने दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, शिवसेनेच्या (उबाठा) नेत्यांविरोधातही कट रचला जात आहे, असे संजय राऊत यांनी दिल्लीउच्च न्यायालयाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचे लोकसभेतील नेते राहुल शेवाळे यांनी हा खटला दाखल केला आहे. यात शिवसेनेचे (उबाठा) नेते आपल्या पक्षाविरोधात भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करत असल्याचे शेवाळे यांनी म्हटले आहे. यानंतर, 28 मार्चला उच्च न्यायालयाने याचिका स्वीकारत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना नोटीस जारी करत उत्तर मागीतले होते. 

आपण 'असे' कोणतेही विधान केलेले नाही -हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या उत्तरात राऊत यांनी संविधानाच्या कलम 19(1)(ए) नुसार, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख केला. तसेच, विश्वसनीय माहितीचा हवाला देत राऊत म्हणाले, शिंदे गटाने सत्तेच्या लालसेपोटी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक मोबदल्यात "असंवैधानिक कृत्य" केल्याचा आपला विश्वास आहे. आपण, भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) 2000 कोटी रुपये दिले असल्याचे कोणतेही विधान केलेले नाही. तसेच, राजकीय पक्ष ही एक निर्जीव संघटना आहे. यामुळे ती बदनामीच्या खटल्याचा विषय होऊ शकत नाही. मानहानी, व्यक्तीच्या प्रतिष्ठेशी संबंधित आहे. शिवसेनेची बदनामी करण्यासाठी हा खटला चुकीच्या हेतूने दाखल करण्यात आला आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. 

काय म्हणाले होते संजय राऊत -संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत, "माझी खात्रीची माहिती आहे.... चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत... हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील... देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते..." 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतHigh Courtउच्च न्यायालयdelhiदिल्लीShiv Senaशिवसेना