२०० जणांना वास्तव्यास प्रतिबंध गणेशोत्सव: कार्यकर्त्यांचाही सहभाग

By Admin | Updated: September 11, 2015 21:24 IST2015-09-11T21:24:58+5:302015-09-11T21:24:58+5:30

जळगाव : जळगाव शहर व जामनेर तालुक्यातील सुमारे २०० जणांना गणेशोत्सव काळासाठी शहरातील वास्तव्यास प्रतिबंध घालण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश येत्या सोमवारी बजावले जाण्याचे संकेत आहेत. यात काही राजकीय मंडळींचाही समावेश असल्याचे समजते.

200 people's residence ban Ganeshotsav: Workers also participate | २०० जणांना वास्तव्यास प्रतिबंध गणेशोत्सव: कार्यकर्त्यांचाही सहभाग

२०० जणांना वास्तव्यास प्रतिबंध गणेशोत्सव: कार्यकर्त्यांचाही सहभाग

गाव : जळगाव शहर व जामनेर तालुक्यातील सुमारे २०० जणांना गणेशोत्सव काळासाठी शहरातील वास्तव्यास प्रतिबंध घालण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश येत्या सोमवारी बजावले जाण्याचे संकेत आहेत. यात काही राजकीय मंडळींचाही समावेश असल्याचे समजते.
जळगाव शहर, एमआयडीसी, रामानंद नगर, जिल्हापेठ, तालुका व शनिपेठ पोलीस स्टेशन, नशिराबाद व जामनेर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत विविध गुन्हे दाखल असलेल्या विशेषत: गणेशोत्सव काळात दहशत निर्माण करणार्‍यांची यादी प्रशासनाने संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रमुखांना दिली होती. त्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशन प्रमुखाने आपल्या हद्दीत गुन्हे दाखल असलेल्यांची यादी पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडे दिले होती. या कार्यालयाकडून ही यादी आता जळगाव प्रांत कार्यालयाकडे सादर झाली आहे. संबंधित व्यक्तीस गणेशोत्सव व बकरी ईद कालावधित गावात वास्तव्यास प्रतिबंध घालावा असा प्रस्ताव पोलिसांकडून देण्यात आला आहे.
गणेशोत्सव व बकरी ईद हे हिंदू मुस्लीम बांधवांचे प्रमुख सण येत्या कालावधित आहेत. या कालावधित म्हणजे १५ ते २८ सप्टेंबर दरम्यान फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) प्रमाणे ही कारवाई प्रस्तावित आहे.
प्रत्येक पोलीस स्टेशनला आदेश
पोलीस प्रशासनाकडून प्राप्त प्रस्तावानुसार प्रांत कार्यालयाकडून शहर व तालुका व जामनेर शहरातील सुमारे २०० जणांना १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान शहरात वास्तव्यास प्रतिबंध घालण्यात येणार आहे. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचाही यात समावेश असल्याचे समजते. येत्या सोमवारी प्रत्येक पोलीस स्टेशनकडून संबंधित व्यक्तीस कारवाईचे आदेश बजावले जाणार आहे.

Web Title: 200 people's residence ban Ganeshotsav: Workers also participate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.