शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याच पीएमनं इतकी खालची पातळी गाठली नव्हती; दिल्ली विद्यापीठाच्या 200 शिक्षकांकडून मोदींचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 09:47 IST

शिक्षकांकडून पत्राद्वारे मोदींचा कठोर शब्दांत निषेध

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका होत आहे. काँग्रेससह विरोधकांनी राजीव गांधींबद्दलच्या वक्तव्यावरुन मोदींचा समाचार घेतला. यानंतर आता शिक्षण क्षेत्रातल्या दिग्गजांनीदेखील मोदींच्या विधानावर कडाडून टीका केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या 200 शिक्षकांनी मोदींच्या विधानाबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कामगिरीची माहिती संपूर्ण देशाला आहे. देशानं त्यांच्या कामाचं अनेकदा कौतुक केलं आहे. जेव्हा कारगिलमध्ये भारतानं विजय मिळवला, तेव्हा आपल्या जवानांनी राजीव गांधींचं कौतुक करत घोषणा दिल्या होत्या, असं दिल्ली विद्यापीठाच्या शिक्षकांनी पत्रात म्हटलं आहे. 'मोदींनी राष्ट्राच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या राजीव गांधींचा अपमान केला आहे. मोदींचं विधान पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारं आहे. याआधी कोणत्याही पंतप्रधानानं इतकी खालची पातळी गाठली नव्हती,' अशा कठोर शब्दांत शिक्षकांनी मोदींचा निषेध केला आहे. शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या असलेलं हे पत्र काँग्रेस नेते सॅम पित्रोडांनी ट्विट केलं आहे. उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढमध्ये शनिवारी झालेल्या रॅलीत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना लक्ष्य करताना त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधींवरदेखील टीका केली. 'तुमच्या (राहुल गांधींच्या) वडिलांना त्यांच्या राजदरबारातील लोकांनी मोठा गाजावाजा करत मिस्टर क्लीन म्हटलं होतं. मात्र हळूहळू भ्रष्टाचारी नंबर वनच्या रुपात त्यांचं आयुष्य संपलं. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुकीला क्षमा करतो. मात्र फसवणूक करणाऱ्याला कधीही माफ करत नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी राजीव गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली होती. मोदींच्या या टीकेला राहुल यांनी उत्तर दिलं होतं. 'मोदीजी, लढाई संपली आहे. तुमची कर्म तुमची वाट पाहत आहेत. माझ्या वडिलांवर आरोप करुन तुम्ही वाचू शकणार नाही,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRajiv Gandhiराजीव गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस