पक्षांचा प्रचारावर २०० कोटी रुपयांचा खर्च
By Admin | Updated: February 6, 2015 02:18 IST2015-02-06T02:18:14+5:302015-02-06T02:18:14+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीवर विविध राजकीय पक्षांनी १५० ते २०० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा अंदाज आहे.

पक्षांचा प्रचारावर २०० कोटी रुपयांचा खर्च
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीवर विविध राजकीय पक्षांनी १५० ते २०० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा अंदाज आहे. या निवडणुकीवर होत असलेला बहुतांश खर्च राजकीय पक्षांच्या नावावर असून उमेदवारांचा खासगी खर्च कमी असेल, असे असोचॅम या उद्योग मंडळाने म्हटले आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी खर्चाचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी वाढलेले असेल.
निवडणुकीचा खर्च वाढण्याचे मुख्य कारण प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून जाहिरातींवर होणाऱ्या खर्चात झालेली वाढ हे आहे. निवडणुकीत मुख्य खर्चाचा भर रॅली, तसेच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून दिल्या जाणाऱ्या जाहिरातींवर असतो. जाहिरातींवर खर्च एकूण खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत असतो. असोचॅमचे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी जारी केलेल्या ताज्या आकलनानुसार ही माहिती समोर आली आहे.
उमेदवारांच्या खासगी खर्चांची मर्यादा निश्चित आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांसाठी अशी कोणतीही मर्यादा घालून देण्यात आलेली नाही. अशा त्रुटी दूर करण्याची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादित केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
तंबूही महागले, खानपानाच्या खर्चातही वाढ...
४मुख्य म्हणजे खानपानाचा खर्च वाढला आहे. कार्यकर्त्यांसाठी लावले जाणारे तंबूही महाग झाले. विमानप्रवास महागला. वाहतुकीचा खर्च बस- टॅक्सींवर होणाऱ्या खर्चात भर पडली आहे.