२०० कोटींचे विमा दावे प्राप्त होणार
By Admin | Updated: December 13, 2015 22:52 IST2015-12-13T22:52:01+5:302015-12-13T22:52:01+5:30
तामिळनाडूत अलीकडेच झालेल्या मुसळधार पावसाने आठ खाजगी विमानांचे अंशत: नुकसान झाले आहे. त्याबद्दल संबंधित विमानमालकांकडून जवळपास २०० कोटी रुपयांचे विम्याचे दावे दाखल केले जाऊ शकतात.

२०० कोटींचे विमा दावे प्राप्त होणार
मुंबई : तामिळनाडूत अलीकडेच झालेल्या मुसळधार पावसाने आठ खाजगी विमानांचे अंशत: नुकसान झाले आहे. त्याबद्दल संबंधित विमानमालकांकडून जवळपास २०० कोटी रुपयांचे विम्याचे दावे दाखल केले जाऊ शकतात.
कल्याण जुलर्स, टीव्हीएस मोटर, सन टीव्ही, गरुड, जेट एअरवेज आणि केरळमधील दागिने उत्पादक जॉय अलुकस यांच्या विमानांचा नुकसान झालेल्यांमध्ये समावेश आहे.
तामिळनाडूची राजधानी चेन्नई आणि आसपासच्या जिल्ह्यांत, तसेच पुदुचेरी येथे पावसामुळे पूर आला होता. आलेल्या पुराने झालेल्या नुकसानीबाबत सामान्य लोक आणि उद्योगांकडून विमा उद्योगाकडे जवळपास ३ हजार कोटी रुपयांचे दावे प्राप्त झाले आहेत.