- २०० कोटींच्या बोगस कर्ज वाटपात आमदारही लाभार्थी एकनाथराव खडसे : आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करणार

By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:32+5:302016-04-26T00:16:32+5:30

जळगाव : जिल्हा बँकेमार्फत होणार्‍या कर्ज वाटपाबाबत सध्या गैरसमज पसरविले जात आहेत. गेल्या वर्षी टिश्यू कल्चर केळीच्या लागवडीसाठी पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. एरंडोल व धरणगाव तालुक्यात २०० कोटींचा बोगस कर्ज वाटपाचा प्रकार उघडकीस आला आहे. या कर्जाचा लाभ हा आमदारांनी देखील घेतला असून याप्रकरणाची आर्थिक गुन्हेशाखेकडून चौकशी करण्यात येईल व दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल, असा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिला.

- 200 crore of bogus debt distributed among beneficiaries: Eknathra Khadse: Financial Crime Branch to conduct inquiry | - २०० कोटींच्या बोगस कर्ज वाटपात आमदारही लाभार्थी एकनाथराव खडसे : आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करणार

- २०० कोटींच्या बोगस कर्ज वाटपात आमदारही लाभार्थी एकनाथराव खडसे : आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करणार

गाव : जिल्हा बँकेमार्फत होणार्‍या कर्ज वाटपाबाबत सध्या गैरसमज पसरविले जात आहेत. गेल्या वर्षी टिश्यू कल्चर केळीच्या लागवडीसाठी पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. एरंडोल व धरणगाव तालुक्यात २०० कोटींचा बोगस कर्ज वाटपाचा प्रकार उघडकीस आला आहे. या कर्जाचा लाभ हा आमदारांनी देखील घेतला असून याप्रकरणाची आर्थिक गुन्हेशाखेकडून चौकशी करण्यात येईल व दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल, असा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिला.
खडसे यांच्या उपस्थितीत २५ रोजी कृषी मेळावा, प्रदर्शन व खरीप आढावा बैठक झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते.

प्रत्येक शेतकर्‍याला कर्ज मिळणार
खरीप हंगामासाठी यावर्षी २६०६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे नियोजन आहे. त्यात जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकेच्या मार्फत ही कर्जवाटप होणार आहे. जिल्हा बँक ही केवळ एजन्सी म्हणून काम करणारी बँक आहे. सध्या पीक कर्ज वाटपाबाबत गैरसमज पसरविले जात आहेत. जिराईत, बागाईत शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळणारच आहे. एरंडोल व धरणगाव तालुक्यात टिश्यू कल्चर केळीसाठी कर्ज घेतले होते. मात्र प्रत्यक्षात टिश्यू कल्चर केळीची लागवड करण्यात आलीच नाही. आमदारांनी देखील कर्जाचा लाभ घेतला असून २०० कोटींच्या कर्जाचा बोगस व्यवहार समोर आला आहे. अशा बोगस कर्जामुळे जो खरा पात्र शेतकरी आहे त्याच्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Web Title: - 200 crore of bogus debt distributed among beneficiaries: Eknathra Khadse: Financial Crime Branch to conduct inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.