शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
3
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
4
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
5
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
6
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
7
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
8
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
9
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
10
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
11
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
12
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
13
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
14
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
15
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
16
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
17
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
18
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
19
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

घरातला 'कर्ता' गेला, 200 पेक्षा अधिक चिमुकल्यांनी गमावले कुटुंबातील सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 17:53 IST

श्रीलंकेतील एका प्रसिद्ध चॅरिटी संस्थने याबाबत माहिती दिली. या हल्ल्यात कित्येक कुटुबांनी त्यांच्या घरातील कर्ता व्यक्ती गमावला आहे.

कोलंबो - जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना रविवारी (21 एप्रिल) श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. कोलंबो येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 359 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 500 पेक्षा अधिक जण जखमी झाले. तर, या हल्ल्यात जवळपास 200 चिमुकल्यांनी आपले नातेवाईक गमावले आहेत. त्यामध्ये अनेकांनी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला गमावले.

श्रीलंकेतील एका प्रसिद्ध चॅरिटी संस्थने याबाबत माहिती दिली. या हल्ल्यात कित्येक कुटुबांनी त्यांच्या घरातील कर्ता व्यक्ती गमावला आहे. तर अनेक कुटुंबांकडे बचतीचे पैसेही उरले नसून आता उदरनिर्वाहासाठीही साधनसामुग्री नसल्याचे कोलंबोतील श्रीलंका रेड क्रॉस सोसायटीने म्हटले आहे. श्रीलंकेतील या स्फोटानंतर संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. पुन्हा दहशतवादी हल्ले होण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलीस, लष्कर सज्ज असून नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. श्रीलंकेत ज्या दहशतवादी गटाने स्फोट घटवले त्याच गटातील काही दहशतवाद्यांचा कोलंबो शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांसह महत्त्वाचे पूल पुन्हा उडवून देण्याचा कट असल्याचे सरकारने म्हटले आहे. इसिसशी संबंधित नॅशनल तौहिद जमात या दहशतवादी गटाने श्रीलंकेत बॉम्बस्फोट उडवले होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहिम सुरू केल्या आहेत. 

या बॉम्ब हल्ल्यामुळे जवळपास 75 कुटुंबीय उद्धवस्त झाली आहेत. तर 500 जण जखमी झाले असून त्यांपैकी अनेकांना अपंगत्व आल्याने ते काम भविष्यात करू शकणार नाहीत, असेही वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. या हल्ल्यात अनेकांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले आहेत. मोठा मानसिक आघात या कुटुबीयांवर झाला आहे. त्यामुळे या पीडितांना मानसिक प्राथमोपचाराची गरज आहे, असेही एसएलआरसीएसने म्हटले आहे. या कुटुंबांना आता नवीन आव्हानांचा सामना करायचा आहे. त्यामुळे या पीडितांच्या पाठीशी सामाजिक संस्थांनी उभे राहणे त्यांना धीर देणे गरजेचे आहे. तसेच, शक्य झाल्यास हल्ल्यात अनाथ झालेल्या चिमुकल्यांचे पालकत्वही स्विकारणे गरजेचे असल्याचे संस्थेने म्हटले आहे.     

 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाsri lanka bomb blastश्रीलंका बॉम्ब स्फोटDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल