२०... उमरेड... वीज
By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:07+5:302015-02-21T00:50:07+5:30
वीज कोसळून एक ठार

२०... उमरेड... वीज
व ज कोसळून एक ठार उमरेड : जोरात कोसळलेली वीज झाडावर कोसळल्याने त्या झाडाखाली उभ्या असलेल्या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, अन्य एक किरकोळ जखमी झाला. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेड-भिवापूर मार्गावरील नवेगाव शिवारात शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. विवेक वसंतराव येनगंटीवार (३९, रा. अयोध्यानगर नागपूर) असे मृताचे नाव आहे. विवेक हा त्याचा मित्र अक्षय विनोद भुयारकर (२१, रा. विठ्ठलनगर, नागपूर) सोबत मोटरसायकलने भिवापूरला स्टॅम्प पेपर खरेदी करण्यासाठी गेला होता. तो भिवापूरहून परत येत असताना नवेगाव शिवारात पावसाला सुरुवात झाल्याने तो झाडाच्या आडोशाला उभा होता. दरम्यान, जोरात कडाडलेली वीज झाडावर कोसळली. त्यात तो गंभीर जखमी झाला आणि काही वेळातच घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला. यात त्याचा मित्र अक्षय हा किरकोळ जखमी झाला. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)***