२०... उमरेड

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:04+5:302015-03-20T22:40:04+5:30

बालिकेचा विनयभंग

20 ... Umred | २०... उमरेड

२०... उमरेड

लिकेचा विनयभंग
उमरेड : साडेचार वर्षीय बालिकेशी अश्लील चाळे करीत विनयभंग करणाऱ्यास नागरिकांनी चांगलाच चोप दिला. ही घटना उमरेड शहरात शुक्रवारी दुपारी घडली.
सदर आरोपीचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिल्याने त्याचे नाव कळू शकले नाही. आरोपीने सदर बालिकेशी अश्लील चाळे केल्याने तिने हा प्रकार आईला सांगितला. या प्रकाराची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्याला चांगलेच बदडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीने या बालिकेसोबत १५ दिवसांपूर्वी असाच प्रकार केला होता. त्यावेळी तिच्या आईने त्याला समज देऊन सोडून दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आरोपीचे नाव जाहीर करता येत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे पोलिसांच्या या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)
***
जप्त केलेल्या रेतीचा लिलाव
उमरेड : महसूल विभागाने विविध ठिकाणी कारवाई करून जप्त केलेल्या रेतीचा शुुक्रवारी लिलाव करण्यात आला.
महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीच्या विरोधात मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत जप्त करण्यात आलेल्या रेतीसाठ्याचा शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास लिलाव करण्यात आला. यातून एक लाख ४३ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी उमेश काळे, तहसीलदार चंद्रभान खंडाईत, अधिकार शुल्क अधिकारी रणजित दुसावार, नायब तहसीलदर अरविंद सेलोकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: 20 ... Umred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.