२०... सावनेर... रेती
By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:15+5:302014-12-20T22:28:15+5:30
रेतीचोरट्यांवर दंडात्मक कारवाई

२०... सावनेर... रेती
र तीचोरट्यांवर दंडात्मक कारवाई २३६ प्रकरणे : १० लाख ७४ हजारांचा दंड वसूलसावनेर : तालुक्यातील विविध रेतीघाटांमधून रेतीची चोरी केली जात आहे. महसूल विभागाने एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या आर्थिक वर्षांत रेतीचोरीची एकूण २३६ प्रकरणे नोंदविली. यातून १० लाख ७४ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली.तालुक्यात सुरू असलेल्या रेतीचोरीला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, रेतीतस्कारांना लगाम घालण्यात महसूल विभागातील स्थानिक अधिकाऱ्यांना फारसे यश आले नाही. तालुक्यात रेतीतस्करांवर कारवाई केली जात आहे. मात्र ती तोकडी पडत असल्याचे दिसून येते. महसूल विभागाने एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या आर्थिक वर्षांत रेतीतस्करांविरुद्ध मोहीम उघडली होती. यात एकूण २३६ प्रकरणांची नोंद करून एकूण १० लाख ७४ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. एप्रिल २०१४ ते ऑक्टोबर २०१४ या सहा महिन्यांत रेतीचोरीची एकूण २५२ प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यातून १४ लाख ७८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. १८ नोव्हेंबरपर्यंत यात १९ प्रकरणांची भर पडली. या १९ प्रकरणांमधून ८९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती महसूल कर्मचाऱ्यांनी दिली. एवढे असूनही तालुक्यातील रेतीचोरीला आळा घालण्यात तहसील कार्यालयाला यश आले नाही. तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचे रेतीतस्करांशी आर्थिक लागेबांधे असल्याने तसेच रेतीतस्कारांना राजकीय वरदहस्त असल्याने रेतीचोरीला कायमस्वरूपी आळा घालणे शक्य होत नसल्याचे जाणकारांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)***