दाणाबाजारातील हमालांच्या मजुरीत २० टक्के वाढ
By Admin | Updated: February 5, 2016 00:33 IST2016-02-05T00:33:36+5:302016-02-05T00:33:36+5:30
जळगाव- दाणाबाजारातील हमाल बांधवांच्या मजुरीमध्ये २० टक्के वाढ करण्यात आली आहे. माथाडी व जनरल कामगार संघटनेशी संलग्न कामगार दाणाबाजारात मोठ्या संख्येने काम करतात. दर दोन वर्षांनी हमाली दरात वाढ करावी लागते. त्याची मुदत डिसेंबर अखेरीस संपली होती.

दाणाबाजारातील हमालांच्या मजुरीत २० टक्के वाढ
ज गाव- दाणाबाजारातील हमाल बांधवांच्या मजुरीमध्ये २० टक्के वाढ करण्यात आली आहे. माथाडी व जनरल कामगार संघटनेशी संलग्न कामगार दाणाबाजारात मोठ्या संख्येने काम करतात. दर दोन वर्षांनी हमाली दरात वाढ करावी लागते. त्याची मुदत डिसेंबर अखेरीस संपली होती. नवीन मजुरी दरांबाबत संघटनेचे पदाधिकारी व दाणाबाजार व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. त्यात मजुरीमध्ये २० टक्के वाढ देण्याचे ठरले. बैठकीत संघटनेचे अध्यक्ष कॉमेश सपकाळे, शरद चौधरी, व्यापारी असोसिएशनचे प्रवीण पगारिया, भगवान हिरवाळे, विठ्ठल डोके उपस्थित होते.