२०... मौदा... चोरी
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:15+5:302015-03-20T22:40:15+5:30
दुचाकीसह रोख पळविली

२०... मौदा... चोरी
द चाकीसह रोख पळविलीमौदा : स्थानिक दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवारातून चोरट्यांनी मोटरसायकलसह ७२ हजार रुपये रोख पळविले. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. रवी बापू वाडीभस्मे (२०, रा. अरोली, ता. मौदा) हा शुक्रवारी दुपारी न्यायालयात आला होता. त्याने त्याच्या मालकीची एमएच-४०/एएल-२२७० क्रमांकाची मोटरसायकल न्यायालयाच्या आवारात उभी केली आणि कामानिमित्त न्यायालयात निघून गेला. दरम्यान, चोरट्यांनी त्याची मोटरसायकल लंपास केली. या मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये ७२ हजार रुपये रोख ठेवले असल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणी मौदा पोलिसांनी रवी वाडीभस्मे याच्या तक्रारीवरून गुन्हा नोदवून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)***