२०... गुन्हे... जोड...०१
By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:54+5:302015-02-21T00:50:54+5:30
पैशाच्या वादातून वडिलास मारहाण

२०... गुन्हे... जोड...०१
प शाच्या वादातून वडिलास मारहाणकुही : पैशाच्या वादातून मुलाने वडिलास मारहाण करून गंभीर जखमी केले. सदर आरोपी मुलास अटक करण्यात आली. ही घटना कुही तालुक्यातील वेलतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या देवळी (कला) येथे बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.बंडू महागू बारई (५५, रा. देवळी, ता. कुही) असे जखमी वडिलाचे नाव असून, रोशन बंडू बारई (२६, रा. देवळी, ता. कुही) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. बंडू आणि त्याचा मुलगा रोशन यांच्यात काही दिवसांपासून पैशामुळे वाद निर्माण झाला होता. दरम्यान, बंडू हा बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे शेतात पिकांचे राखण करण्यासाठी गेला होता. रात्रीची वेळ असल्याने तो शेतातील छोट्या झोपडीत झोपला होता. त्यचवेळी रोशन हा शेतात पोहोचला आणि त्याने लोखंडी सब्बलने बंडूच्या डोक्यावर वार केले. यात बंडू गंभीर जखमी झाला. त्याला लगेच कुही येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणी वेलतूर पोलिसांनी भादंवि ३०७ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी रोशनला अटक केली. सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गोंदके करीत आहे.***