२०... गुन्हे ... जोड
By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:56+5:302015-02-21T00:50:56+5:30
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

२०... गुन्हे ... जोड
अ ्ञात वाहनाची दुचाकीला धडकतरुणाचा मृत्यू : मौदा परिसरातील अपघातमौदा : भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौदा परिसरातील काच कंपनीजवळ गुरुवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली.रामप्रसाद सदाशिव बावनकुळे (३५, रा. नवेगाव, चिचघाट) असे मृत तरुणाचे नाव आहे. रामप्रसाद हा एमएच-३६/टी-४२२२ क्रमांकाच्या मोटरसायकलने जात होता. दरम्यान, काच कंपनीजवळ अज्ञात भरधाव वाहनाने त्याच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात तो खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला आणि काही वेळातच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.***भेंडाळा येथे घरफोडीसावनेर : खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भेंडाळा येथे घरफोडी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. यात चोरट्यांनी २ लाख ७३ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. फिर्यादी उषा युवराज ठाकरे (४८, रा. भेंडाळा, ता. सावनेर) या काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. त्यामुळे घरी कुणीही नसल्याचे पाहून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या दाराची कडी तोडून आत प्रवेश केला. यात चोरट्यांनी कपाटातील १ लाख ५६ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि १ लाख १७ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ७३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी खापा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.***बुटीबोरी एमआयडीसीमध्ये चोरीनागपूर : बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील कंपनीत चोरी झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. यात चोरट्यांनी ३ लाख २५ हजार रुपये किमतीचा ऐेवज चोरून नेला.फिर्यादी प्रसन्न चिंताननी पाटणकर (३४, रा. नागपूर) यांच्या मालकीची बुटीबोरी एमआयडीसी परिसरात र्फार्म फ्रेश फूड प्रोसेसिंग नामक कंपनी आहे. चोरट्यांनी या कंपनीच्या आवरात प्रवेश केला आणि तेथील कुलिंग सिस्टीम मशीन लंपास केली. या मशीनची किंमत ३ लाख २५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी भादंवि ४६१, ३८० अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)***