शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

बिहारच्या नदी-नाल्यांमध्ये सापडताहेत एके-47; सर्च ऑपरेशन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 16:21 IST

आतापर्यंत 20 एके-47 रायफल, 500 सुटे भाग पोलिसांच्या हाती

पाटणा: बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात पोलिसांकडून सुरू असलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये आतापर्यंत 20 एके-47 रायफल सापडल्या आहेत. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. गंगा नदीला जाऊन मिळणाऱ्या नाल्यांमध्ये सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये एके-47 सापडल्यानंतर पोलिसांनी मुंगेरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलं. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात एके-47 चे सुटे भाग आढळून आले. नद्या आणि नाल्यांमधून पोलिसांनी एके-47 चे सुटे भाग ताब्यात घेतले. 29 ऑगस्टला एका हत्यारांच्या रॅकेटचा पदार्फाश झाल्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यात सर्च ऑपरेशन सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत 20 एके-47 रायफल आणि 500 सुटे भाग आढळून आले. जिल्ह्यातील नदी-नाल्यांमध्ये हत्यारांचे सुटे भाग सापडल्यानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. सध्या मुंगेर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पोलिसांकडून तपास सुरू आहे. मुंगेर जिल्हा अवैध हत्यारांच्या निर्मितीसाठी कुख्यात आहे. या जिल्ह्यात अत्याधुनिक हत्यारांची निर्मिती केली जाते. त्यामुळेच या जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. यावेळी गंगा नदीच्या किनाऱ्यावरुन एके-47 चे 281 सुटे भाग सापडले आहेत. सध्या पोलिसांनी या भागात जोरदार कारवाई सुरू केली असून मंगळवारी पोलिसांना मंजार वर्धा गावातील एका घरात एके-47 चे 91 सुटे भाग आढळले आहेत. विशेष म्हणजे या घरावर छापा टाकण्याआधी या घरात वास्तव्यास असणारे लोक फरार झाले होते.  

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी