शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला २ हजार कोटींचे क्लस्टर; ५ हजार युवकांना रोजगार निर्माण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 06:19 IST

पुण्यातील रांजणगाव आता हाेणार इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून विकसित

नवी दिल्ली : महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक उद्योग गुजरातमध्ये जात असताना केंद्र सरकारने आज महाराष्ट्राला २ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक क्लस्टर देऊ केले आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग  क्लस्टर (ईएमसी) उभारण्यासाठी केंद्राने मंजुरी दिली आहे. यातून ५ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. अडीच वर्षात हे क्लस्टर विकसित होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस प्रकल्प व बल्क ड्रग पार्कसारखे मोठे प्रकल्प राज्यातून गेल्याने शिंदे - फडणवीस सरकारला विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या आरोपांना व लोकक्षोभाला सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी महाराष्ट्रातील रांजणगाव येथे ईएमसी उभारण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) हे क्लस्टर उभारण्याची मंजुरी आज दिली. यामुळे रांजणगाव एक इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून विकसित होईल, असेही ते म्हणाले. 

तरुणांना उद्याेगाची संधी-

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्मिती भारतीय बनावटीची राहावी, यासाठी केंद्र सरकार प्रोत्साहन देत असून, या हेतूने पुण्यातील सी-डॅक या संस्थेच्या माध्यमातून स्टार्टअपला चालना देण्यात येणार असल्याचे राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले. सी-डॅक ही इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असून, येत्या काही वर्षात एक हजार कोटी रुपयांचे स्टार्टअप सुरू करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स चीप व इतर पूरक उद्योगांवर यात भर दिला जाणार आहे. यात महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांनी उद्योग उभारावेत, यासाठी येत्या काही दिवसात पुण्यात रोड शो हाेणार असल्याचे ते म्हणाले. 

उद्योग गेल्याने फरक पडत नाही-

महाराष्ट्रातून उद्योग जात असल्याने घाईघाईने या प्रकल्पाची घोषणा केली काय? असे विचारले असता राजीव चंद्रशेखर म्हणाले, हे स्पर्धेचे युग आहे. एखाद्या राज्यातून एखादा उद्योग गेल्याने फरक पडत नाही.

बनावट कथानक : फडणवीस

आमच्या सरकारच्या काळात एकही उद्योग राज्याबाहेर गेलेला नाही. पण सध्या बनावट कथानकांची फॅक्टरी उघडून त्याद्वारे महाराष्ट्राची बदनामी करण्याच्या हेतूने ‘मविआ’चे काही नेते आरोप करीत असल्याचे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे