शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बोगद्यातील कामगारांच्या बचावासाठी २ नवे पर्याय; पहिला उभे ड्रिलिंग अन् दुसरा हाताने खोदून काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 06:10 IST

Uttarkashi Tunnel Accident: गेल्या १३ दिवसांपासून सिलिक्यारा बोगद्यात अडकून पडलेल्या ४१ कामगारांच्या सुटकेतील अडचणी दूर होताना दिसत नाहीत. अखेरच्या क्षणी ऑगर मशिन तुटल्याने कामगारांच्या सुटकेसाठी आता दोन पर्यायांचा विचार केला जात आहे.

उत्तर काशी  - गेल्या १३ दिवसांपासून सिलिक्यारा बोगद्यात अडकून पडलेल्या ४१ कामगारांच्या सुटकेतील अडचणी दूर होताना दिसत नाहीत. अखेरच्या क्षणी ऑगर मशिन तुटल्याने कामगारांच्या सुटकेसाठी आता दोन पर्यायांचा विचार केला जात आहे. बोगद्याला उभे ड्रिल मारून थेट कामगारांपर्यंत पोहोचायचे किंवा मानवी ड्रिलिंग सुरू करणार असल्याचे बोगदातज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी सांगितले. कामगारांच्या सुटकेसाठी ड्रिलिंगचा पर्याय म्हणून ऑगर मशिन मागवण्यात आली होती. या मशिनने ४८ मीटरपर्यंत यशस्वी ड्रिलिंग केले; पण त्यानंतर मशिनसमोर अनेक अडथळे येत आहेत. 

प्रत्येक पर्यायाचे फायदे आणि तोटेही...- आता सुटकेसाठी पर्याय काय, असे विचारले असता डिक्स म्हणाले की, आमच्यासमोर अनेक पर्याय आहेत; पण त्यातील प्रत्येक पर्यायाचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. आमचा सामना डोंगराशी आहे. - ड्रिलिंग करताना कामगारांना इजा होऊ नये, मदतकार्य करणारेही सुरक्षित राहावेत, अशा दोन्ही गोष्टी पाहाव्या लागतात. - आधीच बोगद्यात एकदा डोंगर खचला आहे. पुढेही खचू शकतो. त्यामुळे सावधगिरीने ड्रिलिंग करावे लागत आहे, असेही डिक्स यांनी सांगितले.

ऑगर मशिन तुटल्याने आता अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी उभे ड्रिलिंग केले जाणार आहे. त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री डोंगरावर पाठविण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. 

उभ्या बोगद्यासाठी  जागा शोधल्याडोंगराच्या वरच्या बाजूने उभा बोगदा खोदून कामगारांपर्यंत पोहोचण्याचा पर्यायही तपासला जात आहे. उभा बोगदा खोदण्यासाठी शनिवारी सकाळी एक मोठे ड्रिलिंग मशिन डोंगरावर नेण्यात आले. दाेन जागाही बोगद्यासाठी शोधण्यात आल्या. 

प्लाझ्मा कटर आणले जातेय : मुख्यमंत्री धामीऑगर मशिनची पाती मलब्यात अडकून पडली आहेत. उरलेले काम पूर्ण करण्यासाठी हैदराबादहून प्लाझ्मा कटर विमानाद्वारे मागविण्यात येत आहे, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी सांगितले.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAccidentअपघात