२ पुरूषांनी केलेला अत्याचार हा सामूहिक बलात्कार नव्हे - कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची मुक्ताफळे

By Admin | Updated: October 9, 2015 12:10 IST2015-10-09T11:13:26+5:302015-10-09T12:10:55+5:30

दोन पुरूषांनी महिलेवर केलेला बलात्कार म्हमजे सामूहिक बलात्कार नव्हे असे खळबळजनक वक्तव्य कर्नाटकचे गृहमंत्री के.जे.जॉर्ज यांनी केले.

2 Men's atrocities are not gang rape - Lakhs of the Karnataka Home Minister | २ पुरूषांनी केलेला अत्याचार हा सामूहिक बलात्कार नव्हे - कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची मुक्ताफळे

२ पुरूषांनी केलेला अत्याचार हा सामूहिक बलात्कार नव्हे - कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची मुक्ताफळे

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. ९ -   दोन पुरूषांनी महिलेवर केलेला बलात्कार म्हमजे सामूहिक बलात्कार नव्हे, किमान ४ ते ५ व्यक्तींनी बलात्कार केला तरच तो सामूिहक बलात्कार होतो, असे खळबळजनक वक्तव्य कर्नाटकचे गृहमंत्री के.जे.जॉर्ज यांनी केले. राज्यातील कायदा- सुव्यवस्थेची, नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबादारी ज्यांच्या खांद्यावर असते त्याच गृहमंत्र्यांच्या अशा बेजबाबदार वक्तव्यामुळे आता नवा वाद उफाळला आहे. 
कॉल सेंटरमध्ये काम करणा-या एका तरूणीवर काही नराधमांनी बसमध्ये बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली होती. त्या प्रकरणावर बोलताना गृहमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे. 'जर दोन व्यक्तींनी मिळून एखाद्या महिलेवर अत्याचार केला तर त्याला सामूहिक बलात्कार मानता येणार नाही. जर दोनपेक्षा अधिक व्यक्तींनी अत्याचार केला असेल तर त्याला सामूहिक बलात्कार म्हणता येईल, अशी नवीनच व्याख्या मंत्री महोदयांनी सांगितली. 
 

 

Web Title: 2 Men's atrocities are not gang rape - Lakhs of the Karnataka Home Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.