शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोठा अपघात टळला...! ...तर हवेतच एकमेकांना धडकली असती Indigo ची दोन विमानं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 18:29 IST

या घटनेची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होणार, असे डीजीसीएचे अध्यक्ष अरुण कुमार यांनी म्हटले आहे.

नुकताच बेंगळुरूच्या आकाशात मोठा अपघात होता होता वाचला. 9 जानेवारीला सकाळच्या सुमारास इंडिगो एअरलाइन्सच्या दोन विमानांनी बंगळुरू विमानतळावरून उड्डाण केले आणि दोन्ही विमानं हवेत एवढी जवळ आली की धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. पीटीआयने बुधवारी डीजीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

कठोर कारवाई होणार - DGCAअधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, या घटनेची माहिती कोणत्याही लॉगबुकमध्ये नोंदवण्यात आलेली नाही अथवा भारतीय विमानतळ प्राधिकरणालाही (एआयआय) यासंदर्भात कळविण्यात आलेले नाही. या घटनेची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे डीजीसीएचे अध्यक्ष अरुण कुमार यांनी म्हटले आहे.

या विमानांची धडक होता-होता वाचली -इंडिगो आणि एएआयने यासंदर्भात अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. DGCA च्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की  इंडिगोची दोन विमाने - 6E455 (बेंगळुरू-कोलकाता) आणि 6E246 (बेंगळुरू-भुवनेश्वर) - बेंगळुरू विमानतळावर 'सेपरेशन उल्लंघना'त सामील होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दोन्ही विमानांनी 9 जानेवारीच्या सकाळी सुमारे पाच मिनिटांच्या अंतरानेच बेंगळुरू विमानतळावरून उड्डाण केले होते.

एक अधिकाऱ्याने म्हटले आहे की, "उड्डाणानंतर दोन्ही विमाने एकमेकांच्या अगदी जवळ जात होती. 'अ‍ॅप्रोच रडार कंट्रोलर' ने डायव्हर्जिंग हेडिंगचा संकेत दिला, यामुळे दोन विमानांमधील हवेतील टक्कर टळली.

 

टॅग्स :IndigoइंडिगोairplaneविमानBengaluruबेंगळूर