शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

कुमारस्वामी म्हणतात, 'माझं सरकार स्थिर; मी पूर्णपणे निश्चिंत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 18:26 IST

कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा राजकीय नाट्य सुरू झाले आहे. अपक्ष आमदार आर. शंकर आणि एच. नागेश यांनी काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

ठळक मुद्देदोन अपक्ष आमदारांनी कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाठिंबा काढलामाझं सरकार पूर्णतः स्थिर - एच.डी. कुमारस्वामी

बंगळुरू - कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा राजकीय नाट्य सुरू झाले आहे. अपक्ष आमदार आर. शंकर आणि एच. नागेश यांनी काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पण कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नसल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी केला आहे. 'माझं सरकार स्थिर आहे आणि मी पूर्णतः निश्चिंत आहे', अशी प्रतिक्रिया एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना कुमारस्वामी यांनी हा दावा केला आहे. 

नेमके काय म्हणाले कुमारस्वामी?मला माझे सामर्थ्य माहिती आहे. काळजी करू नका, माझे सरकार पूर्णतः स्थिर आहे. गेल्या आठवड्यापासून आमच्या कन्नड टीव्ही चॅनेल्सवर जे काही दाखवले जात आहे, ते पाहून मी त्याचा आनंद घेत आहे. दोन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेत भाजपाला समर्थन देणार असल्याची घोषणा केली आहे. पण यामुळे भाजपाला समर्थन असलेल्यांची संख्या अशी कितीशी वाढणार आहे?, असा प्रश्नही यावेळेस कुमारस्वामी यांनी उपस्थित केला.

दोन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबाअपक्ष आमदार आर. शंकर आणि एच. नागेश यांनी कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकारचा मंगळवारी (15 जानेवारी) पाठिंबा काढून घेतला. मकर संक्रांतीचा दिवस असल्यामुळे याच दिवशी सरकार बदलावं, असं मला वाटतं. सरकार कार्यक्षम असलं पाहिजे, असे अपक्ष आमदार आर. शंकर म्हणाले आहेत. 

तर एच. नागेश यांनी काँग्रेस-जेडीएस सरकारवर हल्लाबोल करत म्हटले की, काँग्रेस-जेडीएसच्या आघाडीचे पक्ष स्थिर सरकार देतील, अशी आशा होती. त्या दोन्ही पक्षांमध्ये कोणतंही सामंजस्य नाही. त्यामुळेच काँग्रेस-जेडीएसचा पाठिंबा काढून मी भाजपाला पाठिंबा देणार आहे. 

तत्पूर्वी कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसची सत्ता उलथून टाकण्यासाठी भाजपानं जोरदार प्रयत्न करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडण्यासाठी भाजपानं काँग्रेसचे काही आमदार गळाला लावले असून, 17 जानेवारीपर्यंत भाजपा सरकार पाडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. भाजपाकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी केला होता. तर काँग्रेसला स्वत:चे आमदार सांभाळता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून आमच्यावर आरोप केले जात असल्याचा पलटवार भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी केला होता.

 

कर्नाटकच्या विधानसभेत काँग्रेस आणि जेडीएसचे एकूण 116 आमदार आहेत. तर भाजपाच्या आमदारांची संख्या 104 इतकी आहे. काँग्रेस-जेडीएसला दोन अपक्षांनी पाठिंबा दिला होता, परंतु त्यांना आता तो पाठिंबा काढून घेतला आहे. यासोबतच बहुजन समाज पार्टीचा एक आमदारदेखील त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसचं संख्याबळ 119 वर जातं. अपक्ष आमदार आर. शंकर आणि बहुजन समाज पार्टीच्या एन. महेश यांची कॅबिनेटमधून गच्छंती करण्यात आल्यानं त्यांचे सत्ताधाऱ्यांसोबतचे संबंध ताणले गेले आहेत.

 

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकkumarswamyकुमारस्वामीcongressकाँग्रेसKarnatak Politicsकर्नाटक राजकारण