शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 22:19 IST

या भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानी जहाजाने पकडले होते...

भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) जहाजाने भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ पकडल्या गेलेल्या सात भारतीय मच्छिमारांची पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीच्या (PMSA) ताब्यातून सुटका केली. ही घटना रविवारी (17 नोव्हेंबर 2024) घडली. या भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानी जहाजाने पकडले होते.

भारतीय तटरक्षक जहाज 'अग्रिम'ने पाकिस्तानच्या सागरी सीमेजवळ तैनात असताना 'नुसरत' या पाकिस्तानी जहाजाचा पाठलाग केला. सुमारे दोन तास चाललेल्या या पाठलागात भारतीय जहाजाने पाकिस्तानी जहाजाला थेट संदेश दिला की, पाकिस्तानी जहाज भारतीय मच्छिमारांना कोणत्याही परिस्थितीत  घेऊन जाऊ शकत नाही.

काय म्हणाले अधिकारी? -संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, "भारतीय तटरक्षक जहाज अग्रिमने पाकिस्तानी जहाज पीएमएस नुसरतचा पाठलाग केला आणि मच्छिमारांना भारतीय जलक्षेत्रातून नेणे अस्वीकार्य असल्याचे स्पष्ट केले. 'काल भैरव' या मासेमारी नौकेवरील या मच्छिमारांना भारतीय सागरी हद्दीतच पकडण्यात आले होते."

मच्छीमार सुखरूप - या बचाव मोहिमेत सुटका करण्यात आलेले सातही मच्छिमार सुखरूप आहेत. मात्र, या प्रक्रियेदरम्यान मच्छिमारांची 'काल भैरव' नावाची बोट खराब होऊन ती बुडाली, असे आयसीजीने म्हटले आहे. ICG च्या निवेदनात म्हटले आहे की, मच्छिमारांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणतीही मोठी शारीरिक दुखापत झालेली नाही. 18 नोव्हेंबर रोजी, ICG जहाज ओखा बंदरावर परत आले, जिथे या घटनेची संयुक्त तपासणी करण्यात आली. या तपासात आयसीजी, राज्य पोलीस, गुप्तचर संस्था आणि मत्स्य विभाग यांचा सहभाग होता. या प्रकरणात, संपूर्ण विभागाने बचाव कार्याचा तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Fishermanमच्छीमारIndiaभारतPakistanपाकिस्तान