२-जी; मारन बंधूंवर आरोपपत्र दाखल

By Admin | Updated: August 30, 2014 02:59 IST2014-08-30T02:59:19+5:302014-08-30T02:59:19+5:30

एअरसेल-मॅक्सिस सौद्याबाबत सीबीआयने शुक्रवारी माजी दूरसंचारमंत्री दयानिधी मारन, त्यांचे बंधू कलानिधी मारन आणि अन्य सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

2-G; The chargesheet filed on Maran Bandhu | २-जी; मारन बंधूंवर आरोपपत्र दाखल

२-जी; मारन बंधूंवर आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्सिस सौद्याबाबत सीबीआयने शुक्रवारी माजी दूरसंचारमंत्री दयानिधी मारन, त्यांचे बंधू कलानिधी मारन आणि अन्य सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात चार कंपन्यांचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
२ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा तपास करताना सीबीआयला एअरसेल-मॅक्सिस सौद्यात गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले.
सीबीआयने मलेशियन व्यावसायिक टी. आनंद कृष्णन या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राल्फ मार्शल, सन डायरेक्ट टीव्ही, मलेशियाच्या मॅक्सिस कम्युनिकेशनचा आरोपी म्हणून समावेश केला आहे.
गुन्हेगारी कट, तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष सीबीआय न्यायाधीश ओ.पी. सैनी ११ सप्टेंबर रोजी आरोपपत्राचा विचार करणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 2-G; The chargesheet filed on Maran Bandhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.