सीआरपीएफचे २ जवान शहीद

By Admin | Updated: May 11, 2015 23:42 IST2015-05-11T23:42:21+5:302015-05-11T23:42:21+5:30

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील संगम भागात सोमवारी दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा

2 CRPF martyrs | सीआरपीएफचे २ जवान शहीद

सीआरपीएफचे २ जवान शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील संगम भागात सोमवारी दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक अधिकारी आणि एक जवान असे दोन जण शहीद झाले. जेथे हा हल्ला झाला ते स्थळ श्रीनगरपासून ४० कि.मी. अंतरावरील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर आहे, असे पोलिसांनी सांगितले.
असिस्टंट सब इन्स्पेक्टर ओंकार सिंग आणि हेड कॉन्स्टेबल तिलक राज अशी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील करून हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे काम सुरू केले. (वृत्तसंस्था)

Web Title: 2 CRPF martyrs