शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पंजाबमधील शालेय शिक्षणाबाबत 2 मोठे निर्णय; खाजगी शाळांच्या फी वाढीवर घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 17:53 IST

Bhagwant Mann : खासगी शाळांच्या फी वाढीवर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर आता या सत्रात होणाऱ्या प्रवेशांमध्ये शाळांच्या फीमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. या निर्णयांबाबत पंजाब सरकार लवकरच धोरण जारी करणार आहे.

चंडीगड : पंजाबमध्ये सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी शालेय शिक्षणाबाबत दोन मोठे निर्णय घेतले आहेत. आपल्या पहिल्या निर्णयात त्यांनी खाजगी शाळांच्या फी (Private School Fees) वाढीवर बंदी घातली आहे, त्याचप्रमाणे दुसऱ्या निर्णयात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत की, कोणत्याही शाळा विशिष्ट दुकानातून पुस्तके आणि युनिफॉर्म (School Uniform) घेण्याचा दबाव टाकणार नाही. मुलांचे पालक आपल्या सोयीनुसार कुठूनही युनिफॉर्म आणि पुस्तके खरेदी करू शकतील. 

खासगी शाळांच्या फी वाढीवर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर आता या सत्रात होणाऱ्या प्रवेशांमध्ये शाळांच्या फीमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. या निर्णयांबाबत पंजाब सरकार लवकरच धोरण जारी करणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, शिक्षण महागल्याने ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. महागड्या फीमुळे पालकांना मुलांना शाळेतून काढून द्यावे लागत असून मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. हे लक्षात घेऊन पंजाब सरकारने शिक्षणाशी संबंधित हे दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने पंजाबमधील सर्व खासगी शाळांना या अधिवेशनात एक रुपयाचीही फी वाढ करणार नाही आणि या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, दिल्लीप्रमाणे पंजाबमध्येही आम आदमी पार्टीच्या अजेंड्यामध्ये शिक्षणाचा मुद्दा सर्वात वरचा होता. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्याची शाळा व्यवस्था सुधारण्याचे आणि शिक्षण व्यवस्था सुधारण्याचे आश्वासन दिले होते. पंजाब निवडणुकीत आम आदमी पार्टीला मिळालेल्या प्रचंड विजयामागे शिक्षणाचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले16 मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेल्या भगवंत मान यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यापूर्वी त्यांनी 25 हजार सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच 35 हजार हंगामी कर्मचाऱ्यांनाही कायम करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच, भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारकडून अँटी करप्शन हेल्पलाइन क्रमांक 9501 200 200 जारी करण्यात आला आहे. याशिवाय, रेशनची होम डिलिव्हरीही जाहीर करण्यात आली आहे. सरकार स्वतः रेशन घरी पोहोचवणार आहे.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबEducationशिक्षण