शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

शपथविधीआधीच कमलनाथ वादात; शीख दंगल प्रकरणात पाय खोलात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 13:42 IST

कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपद न देण्याची भाजपाची मागणी; काँग्रेसवर जोरदार टीका

नवी दिल्ली/भोपाळ: काँग्रेस नेते कमलनाथ थोड्याच वेळात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र याआधीच 34 वर्ष जुन्या प्रकरणामुळे कमलनाथ वादात सापडले आहेत. 1984 च्या शीखविरोधी दंगलीत कमलनाथ यांचं नाव पुढे आलं होतं. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री न करण्याची मागणी भाजपानं केली आहे. ज्या दिवशी दंगल प्रकरणात काँग्रेसच्या एका नेत्याला जन्मठेप झाली, त्याच दिवशी याच दंगलीत नाव असलेल्या एका नेत्याला काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जात आहे. काँग्रेसची ही कृती निषेधार्ह असल्याची टीका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. आज दिल्ली उच्च न्यायालयानं काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना 1984 मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणात दोषी ठरवलं. दंगल भडकवणे आणि कारस्थान रचणे हे दोन गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्यानं कुमार यांना जन्मठेप सुनावण्यात आली. मात्र हत्या प्रकरणात कुमार यांची मुक्तता झाली आहे. याच प्रकरणात काँग्रेस नेते कमलनाथ यांचंही नाव पुढे आलं होतं. शीख समाज ज्या व्यक्तीला हत्याकांडात दोषी समजतो, त्याच व्यक्तीला काँग्रेसकडून मुख्यमंत्री केलं जातं आहे, ही शीख समाजाची मोठी थट्टा आहे, अशा शब्दांमध्ये जेटली यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. सज्जन कुमार शीख विरोधी दंगलीचा चेहरा होते आणि या हत्याकांडाचे डाग काँग्रेस आणि गांधी परिवारावर कायम असतील, असं जेटलींनी म्हटलं. शीख विरोधी दंगलीवरुन भाजपा नेते काँग्रेसवर तोफ डागत असताना दिग्विजय सिंह पक्षाच्या बचावासाठी पुढे आले. जेटली यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असं ट्विट सिंह यांनी केलं आहे. 'या प्रकरणातील एफआयआरमध्ये किंवा आरोपपत्रात कमलनाथ यांचं नाव नाही. कोणत्याही न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला सुरू नाही. ते 1991 पासून केंद्रात मंत्री होते. तेव्हा भाजपाला आक्षेप नव्हता. मात्र आताच नेमकं काय झालं?,' असा सवाल दिग्विजय सिंह यांनी जेटली आणि भाजपा नेत्यांना विचारला आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाArun Jaitleyअरूण जेटली