१९६५ च्या युद्धातील शहिदांना आदरांजली
By Admin | Updated: August 29, 2015 00:29 IST2015-08-29T00:29:07+5:302015-08-29T00:29:07+5:30
पाकिस्तानसोबत १९६५ मध्ये झालेल्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आदींनी शहीद

१९६५ च्या युद्धातील शहिदांना आदरांजली
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत १९६५ मध्ये झालेल्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आदींनी शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली.
तिन्ही सैन्यदलाचे सर्वोच्च कमांडर असलेल्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ‘इंडिया गेट’जवळील अमर जवान ज्योती येथे पुष्पचक्र अर्पण केले. त्यावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते.
या युद्धाच्या ५० व्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करताना मी या शूर जवानांसमोर नतमस्तक होतो आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी ते लढले. जवानांचे धैर्य आणि शौर्य प्रेरणादायी असे आहे. प्रत्येक अडचणींवर त्यांनी मात केली. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या शक्तिशाली नेतृत्वात हे युद्ध लढले गेले. ते देशाच्या शक्तीचे मुख्य स्रोत होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने असामान्य शौर्याचा परिचय दिला. त्यामुळेच देशाच्या इतिहासात एक सोनेरी पान लिहिले गेले.