१९... सारांश
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:21+5:302015-02-20T01:10:21+5:30
३० तरुणांनी केले रक्तदान

१९... सारांश
३ तरुणांनी केले रक्तदान खापरखेडा : सिल्लेवाडा येथे भाजप कार्यकर्ते व आयुष ब्लड बँके च्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केेले होते. त्यात ३० तरुणांनी रक्तदान केले. यावेळी छाया ढोले, पंचफुला पंडागडे, आकाश भुरकुंडे, सूरज गुप्ता, जगदीश कैथवास, परमानंद दुबे, रामानंदन गुप्ता, रोहित सूर्यवंशी यांच्यासह अन्य तरुणांनी रक्तदान केले.***खापरखेड्यात वारकरी मेळावाखापरखेडा : स्थानिक वॉर्ड क्रमांक - २ मध्ये शुक्रवारी वारकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यात धनंजय मेटे, विठ्ठल साबळे, विलास झिल्लारे, रामकृष्ण ताकोटे, पांडुरंग बारापात्रे यांचे प्रवचन होणार आहे. सकाळी पालखी प्रभातफेरी काढण्यात येईल. सदर मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.***मुरमाचे ढिगाऱ्यामुळे वाहतुकीस अडसरमेंढला : वडविहिरा-वाढोणा मार्गाच्या दुरुस्तीसाठी या मार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात मुरमाचे ढिगारे टाकण्यात आले आहे. हा मार्ग आधीच अरुंद असल्याने या ढिगाऱ्यांमुळे वाहतुकीस अडसर निर्माण होत आहे. रोडच्या दुरुस्तीला सुरुवात करून मुरमाची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.***तलावातील पाणी दूषितधर्मापुरी : रेवराळ येथील गावतलावात सांडपाणी सोडले जाते. शिवाय, त्यात कपडे धुतले जात असून, जनावरेही साफ केली जातात. पूजेच्या साहित्याचेही याच तलावात विसर्जन केले जाते. त्यामुळे या तलावातील पाणी दूषित झाले आहे. या प्रकाराला आळा घालून तलावाची साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.***रेवराळ येथे धार्मिक कार्यक्रममौदा : तालुक्यातील रेवराव येथे मानव धर्म सेवक संमेलनानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम पार पडले. गावात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. ग्रामस्थांना आरोग्य स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. यात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झााले होते.***मौदा - महालगाव बससेवा सुरू करा!कोदामेंढी : मौदा-तांडा-महालगाव या मार्गाची दुरवस्था झाल्याने या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास खासगी प्रवासी वाहनांनी प्रवास करावा लागतो. हा प्रवास जीवघेणा असल्याने या मार्गाची दुरुस्ती करून बससेवा सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.***