१९... पेंच... जोड
By Admin | Updated: December 19, 2014 22:57 IST2014-12-19T22:57:04+5:302014-12-19T22:57:04+5:30
प्रकल्पाच्या मुख्य उजव्या कालव्याची लांबी ४८.५ कि.मी.आहे. या कालव्याव्दारे कोराडी-खापरखेडा येथील वीज केंद्राला पाणीपुरवठा केला जातो. याची वहन क्षमता २८.४ दशलक्ष घनमीटर प्रति सेकंद असून, ओलिताखालील शेतजमिनीचे क्षेत्रफळ ६३०.९०० हेक्टर एवढे आहे. डावा कालवा-भंडारा, तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतीला पाणीपुरवठा करतो. या कालव्याची लांबी ३३ कि.मी. असून, वहनक्षमता ९० दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद आहे. या कालव्याचे ओलिताखालील क्षेत्र २७,३०० हेक्टर एवढे आहे.

१९... पेंच... जोड
प रकल्पाच्या मुख्य उजव्या कालव्याची लांबी ४८.५ कि.मी.आहे. या कालव्याव्दारे कोराडी-खापरखेडा येथील वीज केंद्राला पाणीपुरवठा केला जातो. याची वहन क्षमता २८.४ दशलक्ष घनमीटर प्रति सेकंद असून, ओलिताखालील शेतजमिनीचे क्षेत्रफळ ६३०.९०० हेक्टर एवढे आहे. डावा कालवा-भंडारा, तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतीला पाणीपुरवठा करतो. या कालव्याची लांबी ३३ कि.मी. असून, वहनक्षमता ९० दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद आहे. या कालव्याचे ओलिताखालील क्षेत्र २७,३०० हेक्टर एवढे आहे.----------चौकट-------मस्त्यबीज केंद्र १९८०-८१ मध्ये धरण परिसरातील १०० एकर जमिनीवर ६० ते ७० लाख रुपये खर्च करून विदर्भातील एकमेव सर्वात मोठी परियोजना मत्स्यविकास व्यवसाय महामंडळाने हाती घेतली. यामध्ये १२ हेक्टर जागेवर १८२ टाकी मत्स्यबीज प्रजननासाठी बांधली आहेत. मत्स्य व्यवसाय प्रयोगशाळा, कर्मचारी वसाहत उभारली आहे. -----------चौकट---------पर्यटन विकासाला वावजलाशय परिसर पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने चार टप्प्यात विकासकार्य करण्याची योजना आखली. त्यासाठी ७१ हेक्टर अधिग्रहित जमिनीपैकी पहिल्या टप्प्यात १७ हेक्टर जागेवर विकासकामे करण्याचे प्रस्तावित होते. त्यासाठी एकूण २० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित होता. क्षेत्रिय विकास कार्यक्रमांतर्गत पाच कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये विश्रामगृह, प्रवेशद्वार, बगिचा यांची अर्धवट कामे करण्यात आलीत. कालांतराने अपुऱ्या निधीमुळे ही योजना रखडली. पर्यटन विभाग, पाटबंधारे विभाग, वन व महसूल विभागाच्या उदासीनतेमुळे हे पर्यटनस्थळ धरण निर्मितीच्या ४५ वर्षानंतर आता उजाड माळरानात परिवर्तीत झाले आहे. ***