१९... रेती... जोड

By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:02+5:302015-02-20T01:10:02+5:30

रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री जुनी कामठी परिसरातील वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, एमएच-४०/एके-१०० क्रमांकाचा ट्रक आणि एमएच-४०/एन-०१८५ क्रमांकाच्या टिप्परमध्ये रेती असल्याचे आढळून आले. पोलिसांना पाहताच अंधाराचा फायदा घेत ट्रकचालक हंसराज लीलाधर तुरकर रा. खुर्सापार, जिल्हा मोंदिया आणि टिप्परचालक पवनकुमार धनकर रा. कोराडी, ता. कामठी हे दोघेही पळून गेले. या कारवाईमध्ये कन्हान पोलिसांनी १६ हजार रुपये किमतीच्या चार ब्रास रेतीसह एकूण १७ लाख १६ हजार किमतीचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी खापा, अरोली व कन्हान पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नेांदवून तपास सुरू केली आहे. (प्रतिनिधी)

19 ... sand ... add | १९... रेती... जोड

१९... रेती... जोड

तीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री जुनी कामठी परिसरातील वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, एमएच-४०/एके-१०० क्रमांकाचा ट्रक आणि एमएच-४०/एन-०१८५ क्रमांकाच्या टिप्परमध्ये रेती असल्याचे आढळून आले. पोलिसांना पाहताच अंधाराचा फायदा घेत ट्रकचालक हंसराज लीलाधर तुरकर रा. खुर्सापार, जिल्हा मोंदिया आणि टिप्परचालक पवनकुमार धनकर रा. कोराडी, ता. कामठी हे दोघेही पळून गेले. या कारवाईमध्ये कन्हान पोलिसांनी १६ हजार रुपये किमतीच्या चार ब्रास रेतीसह एकूण १७ लाख १६ हजार किमतीचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी खापा, अरोली व कन्हान पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नेांदवून तपास सुरू केली आहे. (प्रतिनिधी)
----------------
--------------चौकट---------
रेेतीघाटाच्या लिलावाकडे दुर्लक्ष
मौदा तालुक्यातील सूर नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा गोळा झाला आहे. त्यामुळे नदीचा प्रवाह मार्ग बदलवित असल्याने नदीकाठच्या काही गावांना पुराचा धोका उद्भवण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. या नदीवरील रेतीघाटांचा लिालाव करून पात्रातील रेतीचा उपसा करण्याची मागणी काही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली. यासाठी त्यांनी संबंधित ग्रामपंचायतने पारित केलेले ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कार्यवाहीस्तव पाठविले. मात्र, या प्रस्तावावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे रेतीतस्कर आता सूर नदीच्या पात्रातील रेतीचे अवैध उत्खनन करून ती राजरोसपणे चोरून नेत आहे. यात परिसरातील रस्त्यांची दैनावस्था होत असून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
-----------
नद्यांचे अस्तित्वच धोक्यात
रेती तस्कारांनी मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील कन्हान, कोलार, पेंच, सूर यासह अन्य महत्त्वाच्या नद्यांना लक्ष्य बनवून त्यातील रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा करायला सुरुवात केली आहे. वास्तवात या नद्यांवरील महत्त्वाच्या रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला नाही. तस्कर रेती उत्खननासाठी खुलेआम पोकलॅण्ड मशीनचा वापर करतात. त्यामुळे नद्यांच्या पात्रात मोठमोठे खड्डे पडले असून, त्याचा नदीच्या प्रवाहावर विपरीत परिणाम होत आहे. काही नद्यांमधील रेतीसाठा संपण्याच्या मार्गावर असल्याने या नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दुसरीकडे, या रेतीतस्करांवर कठोर कारवाई करण्यास महसूल विभागाचे अधिकारी मागेपुढे पाहतात. पोलिसांना त्यांच्याविरुद्ध थेट कारवाई करता येत नसल्याने त्यांची हिंमत वाढली आहे.
***

Web Title: 19 ... sand ... add

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.