१९.... रामटेक... अपघात

By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:08+5:302015-02-20T01:10:08+5:30

(फोटो-उभा)

19 .... Ramtek ... accident | १९.... रामटेक... अपघात

१९.... रामटेक... अपघात

(फ
ोटो-उभा)
भरधाव तवेराची दुचाकींना धडक
दोघांचा मृत्यू : भंडारबोडी शिवारातील अपघात
रामटेक : भरधाव तवेराने वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन मोटरसायकलींना जोरदार धडक दिली. धडक देताच तवेरा रोडच्या कडेला जाऊन उलटली. त्यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, अन्य तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात रामटेक-भंडारबोडी मार्गावरील वळणावर गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास झाला.
सिद्धार्थ मुनिराज गुडी (२१, रा. वाहिटोला, ता. रामटेक) व मयुरी रमेश सलामे (१९, रा. वाहिटोला, ता. रामटेक) अशी मृतांची नावे असून, पवन नंदकिशोर खुडसाव (२५), राहुल रमेश सलामे (१९) व उमा मुनिराज गुडी (२४) तिघेही रा. वाहिटोला, ता. रामटेक अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व जण एमएच-४०/एएल-४७२१ व विना क्रमांकाच्या मोटरसायकलने वाहिटोला येथून तुमसर तालुक्यातील (जिल्हा-भंडारा) गायमुख येथे देवदर्शनाला जात होते. गायमुख येथे भगवान शंकराचे मंदिर असून, तिथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते.
दरम्यान, रामटेक-भंडारबोडी मार्गावरील भंडारबोडी शिवारातील वळणावर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या एमएच-३१/सीएन-१५३ क्रमांकाच्या तवेराने या दोन्ही मोटरसायकलींना जोरदार धडक दिली. यात सिद्धार्थ व मयुरीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पवन, राहुल व उमा गंभीर जखमी झाले.
माहिती मिळताच रामटेक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिन्ही जखमींना भंडारबोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. तिथे त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर नागपूरला हलविण्यात आले. सदर घटनेमुळे वाहिटोला येथे शोककळा पसरली होती. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (तालुका/प्रतिनिधी)
***

Web Title: 19 .... Ramtek ... accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.