जम्मू काश्मीरमध्ये बस अपघातात 19 प्रवाशांचा मृत्यू, 30 जखमी
By Admin | Updated: October 20, 2016 18:17 IST2016-10-20T18:17:33+5:302016-10-20T18:17:33+5:30
जम्मू काश्मीरमधील रेआसी जिल्ह्यात प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसचा अपघात होऊन 19 जणांचा मृत्यू झाला आहे

जम्मू काश्मीरमध्ये बस अपघातात 19 प्रवाशांचा मृत्यू, 30 जखमी
>ऑनलाइन लोकमत
जम्मू काश्मीर, दि. 20 - प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसचा अपघात होऊन 19 जणांचा मृत्यू झाला आहे. रेआसी जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. ही बस रेआसी येथून बकाल गावाच्या दिशेने जात होती. गुरनाक परिसरात बसने रस्ता सोडला आणि खड्ड्यात जाऊन कोसळली. अपघातात 19 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.