शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराचे थैमान, 19 मुलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 12:35 IST

बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 19 मुलांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देबिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 19 मुलांचा मृत्यू झाला आहे. अनेक मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

मुजफ्फरपूर  - बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 19 मुलांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच दिवसांत मुजफ्फरपूरमध्ये इन्सेफेलाईटीस या आजाराने 19 मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एसकेएससीएच या रुग्णालयात 15 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर खासगी रुग्णालयांमध्ये 4 मुलांचा मृत्यू झाला आहे. अनेक मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

एसकेएमसीएच मुजफ्फरपूरचे अधीक्षक डॉ. सुनील शाही यांनी शनिवारी रुग्णालयात इन्सेफेलाईटिस या आजाराने ग्रस्त असलेल्या 38 मुलांना दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच यातील 14 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. तसेच अनेक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या आजारात मुलांना ताप येतो. त्यांच्यावर सध्या अनेक रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रत्येक वर्षी अनेक मुले या इन्सेफेलाईटीस तापाने दगावतात. गेल्या वर्षीही या आजाराने 22 मुलांचा मृत्यू झाला होता. दरवर्षी पावसाळ्याआधी हा आजार होत असल्याची माहिती लोकांनी दिली आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त दिले आहे. 

2014 पासून इन्सेफेलाईटिस हा आजार मुलांना होत आहे. पाच ते दहा वयोगटातील मुलांना हा आजार होतो. तसेच यामुळे दरवर्षी अनेक मुलांचा मृत्यू होतो. मात्र तरीही सरकारने याबाबत अज्ञाप गंभीर दखल घेतलेली नसल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. डोकं दुखणं, अशक्तपणा येणं, उलट्या होणं, भूक न लागणं, अतिसंवेदनशील होणं ही या आजाराची लक्षणं आहेत. त्यामुळे अशा गोष्टींचा त्रास होत असल्याचं त्वरीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच अस्वच्छ पाण्यापासून दूर राहा, आरोग्याची नीट काळजी घ्या. मच्छारांपासून लांब राहा असे उपाय या आजारापासून वाचण्यासाठी करता येतात.

 

टॅग्स :BiharबिहारDeathमृत्यू