१९.... खापरखेडा...आत्महत्या

By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:00+5:302015-02-20T01:10:00+5:30

जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

19 ... Khaparkkheda ... Suicide | १९.... खापरखेडा...आत्महत्या

१९.... खापरखेडा...आत्महत्या

चाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
दोघांना अटक : वलनी येथील घटना
खापरखेडा : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलनी (माईन्स) येथे रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी तिच्या पतीसह अन्य एकास अटक केली.
पिंकी देवनारायण भारद्वाज (२०, रा. वलनी माईन्स, ता. सावनेर) असे मृत महिलेचे नाव असून, देवनारायण भारद्वाज (२४, रा. रा. वलनी माईन्स, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. अटकेतील अन्य आरोपीचे नाव कळू शकले नाही. रविवारी सकाळी अलार्म वाजल्यानंतर देवनारायणच्या बहिणीला जाग आला. तिने दरवाजा ठोठावल्यामुळे देवनारायणने दार उघडले आणि नंतर काही वेळाने खोलीचे दार बंद केले. काही वेळाने पिंकी ही खोलीतील छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. माहिती मिळताच खापरखेडा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पिंकीचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.
दरम्यान, पिंकीचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा असतानाच तिचे वडील रामदास वसंता राजभर यांनी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पिंकी व देवनारायण यांच्या विवाहाला एक वर्ष पूर्ण व्हायचे आहे. पिंकीने तिच्या माहेरहून हुंड्याची शिल्लक राहिलेली रक्कम तसेच गाडी विकत घेण्यासाठी चार लाख रुपये आणावे, अशी देवनारायणची इच्छा होती. त्यामुळे तो या रकमेसाठी तिच्याकडे सतत तगादा लावायचा. त्यातून तो तिला मानसिक व शारीरिक त्रासही द्यायचा. हा त्रास असह्य झाल्याने तिने घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे राजभर यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले होते. पोलिसांना खात्री पटताच तिच्या पतीसह अन्य एकास अटक केली. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी भादंवि ४९८ (अ), ३०४ (ब), ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक चोरमोले, बाबुलाल राठोड, नंदू सिडाम करीत आहे. (प्रतिनिधी)
***

Web Title: 19 ... Khaparkkheda ... Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.