१९ धरणे आंदोलन जोड
By Admin | Updated: December 19, 2014 22:56 IST2014-12-19T22:56:56+5:302014-12-19T22:56:56+5:30
महाराष्ट्रीय मराठा महासंघ

१९ धरणे आंदोलन जोड
म ाराष्ट्रीय मराठा महासंघनागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसंदर्भात महाराष्ट्रीयन मराठा महासंघाच्या वतीने हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन सुरू केले. प्रमुख मागण्या : मराठा समाजाला विशेष मागास प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याकरिता विधिमंडळात कायदा करावा, रब्बी पिके वाचविण्यासाठी लघु मध्यम प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना देण्यात यावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कार्यान्वित करून अध्यक्ष व संचालकांची नियुक्ती करावी, या महामंडळासाठी ५०० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांना पिकासाठी नुकसानभरपाई स्वरुपात हेक्टरी २५ हजार रुपये देण्यात यावे, जिरायती शेतकऱ्यांना ठिबकसाठी ७५ टक्के अनुदान मंजूर करावे, डी.एड.-बी. एड. विद्यार्थ्यांची सीईटीची अट रद्द करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.नेतृत्व : महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अंकुश पाटील कार्यकर्ते : उमेश गाडगे, आनंद पाटील, बालाजी पाटील, गंगाप्रसाद बाशेट्टी, साहेबराव देशमुख, संदीप भांडवलकर, भूजंग भोसले, दत्तू मोहिते, विलास काचोळे आदी.प्रेस असोसिएशननागपूर : विविध मागण्यांसंदर्भात प्रेस असोसिएशनच्या वतीने हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन सुरू केले आहे.प्रमुख मागण्या : नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला असल्याने राज्यमंत्री, त्यांची कार्यालये कायमस्वरुपी नागपुरात स्थलांतरित करावी अन्यथा उपराजधानीचा दर्जा काढून घ्यावा, कापसाला नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्याच्या दृष्टीने विशेष पॅकेज देण्यात यावे, सौर ऊर्जेवर चालणारे कृषीपंप शेतकऱ्यांना मोफत देण्यात यावे, शासकीय रुग्णालयात रोगांच्या तपासणीकरिता आकारण्यात येणारे शुल्क घेऊ नये, दहावी - बारावीची परीक्षा फी बंद करावी, शासकीय मानयताप्राप्त तसेच खाजगी शाळांमध्ये घेण्यात येणारे प्रवेश शुल्क तसेच अतिरिक्त शुल्कपद्धत बंद करण्यात यावी, नागपूर सुधार प्रन्यासला बरखास्त करावे आदी मागण्यांचा समावेश आहे.नेतृत्व : संघटनेचे अध्यक्ष किशोर सहारे कार्यकर्ते : पंजाब घुटके, जगदीश वानखेडे, सुखदेव सांगलीकर, दिवाकर सेलोकर, रवींद्र धाबर्डे, धर्मपाल जगदीश, सुरेश कोसे, विवेक शेंडे, मिलिंद पवनीपगार, बंडू पोपटकर, संजय देशमुख, शंकर बुरबुरे, विजय शिरसाट आदी.