शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये १.९ कोटी लोक ‘भारतीय’, एनसीआरची पहिली यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:29 IST

बहुप्रतीक्षित राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) पहिली यादी प्रकाशित करण्यात आली असून,आसाममधील ३ कोटी २९ लाख अर्जदारांपैकी १.९ कोटी लोकांना भारताचे कायदेशीर नागरिक म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

गुवाहाटी: बहुप्रतीक्षित राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) पहिली यादी प्रकाशित करण्यात आली असून,आसाममधील ३ कोटी २९ लाख अर्जदारांपैकी १.९ कोटी लोकांना भारताचे कायदेशीर नागरिक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित लोकांची नावे शहानिशा प्रक्रियेच्या विविध टप्प्यांत आहेत, भारताचे महानिबंधक शैलेश यांनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री हा मसुदा प्रकाशित करताना स्पष्ट केले.हा मसुद्याचा एक भाग आहे. यात १.९ कोटी लोकांच्या नावांचा समावेश आहे. उर्वरित लोकांबाबत विविध पातळीवर शहानिशा केली जातआहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरदुसरा मसुदा प्रकाशित केलाजाईल, अशी माहिती शैलेश यांनी रविवारी मध्यरात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.राष्टÑीय नागरिक नोंदणी विभागाचे राज्याचे समन्वयक प्रतीक हजेला यांनी सांगितले की, पहिल्या यादीत ज्यांची नावे नाहीत, अशांनी काळजी करण्याचे कारण नाही. शहानिशा करण्याची प्रक्रिया लांबलचक असल्याने पहिल्या यादीतून अनेकांची नावे समाविष्ट होऊ शकणार नाहीत. तथापि, त्यांनी काळजी करू नये. त्याच्यांशी संबंधित दस्तावेजांची शहानिशा केली जात आहे. दुसरी यादी कधी जारी करणार? असे विचारले असता हजेल यांनीसांगितले की, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात एप्रिलमध्ये होणाºया पुढल्या सुनावणीच्यावेळी केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच या दस्तावेजांची शहानिशा केली जात आहे.ही संपूर्ण प्रक्रिया २०१८ मध्येच पूर्ण केली जाईल, असे महानिबंधक शैलेश यांनी यावेळी स्पष्ट केले. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मे २०१५ मध्ये सुरु करण्यात आली होती. यातहत आसाममधील ६८.२७ लाख कुटुंबियांकडून ६.५ कोटी दस्तावेज प्राप्त झाली होते.बांगलादेशींवर उपायएनआरसी असलेले आसाम हे एकमेव राज्य आहे. १९५१ मध्ये एनआरसी तयार करण्यात आली होती. विसाव्या शतकापासून आसाममध्ये बांगलादेशातून लोकांचे लोंढे येत आहेत, त्यावर हा उपाय मानला जात आहे.

टॅग्स :IndiaभारतAssamआसाम