१९... गुन्हे
By Admin | Updated: February 20, 2015 01:09 IST2015-02-20T01:09:55+5:302015-02-20T01:09:55+5:30
कोंढाळी येथून बोलेरोची चाके लंपास

१९... गुन्हे
क ंढाळी येथून बोलेरोची चाके लंपास कोंढाळी : घरासमोर उभ्या असलेल्या बोलेरोची पाच चाके आणि बॅटरी चोरट्यांनी काढून लंपास केल्याची घटना कोंढाळी येथील कुंभारपुरा येथे रविवारी मध्यरात्री घडली.फिर्यादी शेख इकबाल शेख इलाही (४२, रा. कोंढाळी, ता. काटोल) यांनी त्यांच्या मालकीची एमएच-३५/के-२००५ क्रमांकाची बोलेरा नेहमीप्रमाणे घरासमोर उभी ठेवली होती. दरम्यान, चोरट्यांनी मध्यरात्री या वाहनाची चार चाके व एक स्टेपनी तसेच बॅटरी काढूून चोरून नेली. या साहित्याची एकूण किंमत २८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप लांबट करीत आहे.***दूध विक्रेत्यास लुटलेखापरखेडा : सायकलने दूध विकायला गेलेल्या विक्रेत्यास लुटल्याची घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिल्लेवाडा परिसरात रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. यातील आरोपीस अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.बसेश्वर चंद्रशेखर तंबाखे (७३, रा. सिल्लेवाडा, ता. सावनेर) असे दूधविक्रेत्याचे नाव असून, गुड्डू ऊर्फ रंगिला सुंदर कुरील (रा. सिल्लेवाडा, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बसेश्वर हे शेतकरी असून, ते दूध विक्रीचा व्प्यवसाय करतात. ते रविवारी सकाळी सायलवर दुधाच्या कॅन ठेवून जात असताना आरोपी गुड्डूने त्यांना सिल्लेवाडा परिसरात अडविले आणि त्यांच्याकडून ५०० रुपये हिसकावून पळ काढला. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी भादंवि ३९२ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली. ***रिधोरा शिवारातून टाटासुमो पळविलीकाटोल : चोरट्यांनी टाटासुमो पळविल्याची घटना कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिधोरा (सातगाव) शिवारात सोमवारी मध्यरात्री घडली.फिर्यादी सेवकू शामराव जीवतोडे (४०, रा. सातगाव, ता. काटोल) यांनी त्यांच्या मालकीची एमएच-३४/के-७२१३ क्रमांकाची टाटा सुमो रिधोरा (सातगाव) शिवारात उभी ठेवली होती. दरम्यान, चोरट्यांनी ती चोरून नेली. या टाटासुमोची किंमत दोन लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.***