१९... गुन्हे
By Admin | Updated: December 19, 2014 22:57 IST2014-12-19T22:57:03+5:302014-12-19T22:57:03+5:30
तीन चोरट्यांना अटक

१९... गुन्हे
त न चोरट्यांना अटककामठी : बैलगाडीची लोखंडी चाके चोरून नेत ते कबाडी व्यावसायिकांना विकणाऱ्या तीन चोरट्यांना कामठी पोलिसांनी नुकतीच अटक केली. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. भगवान रामचंद्र राऊत (२६), दीपक प्रकाश बडोदे (२८) व पप्पू बाबुलाल गोयल तिघेही रा. आजनी, ता. कामठी अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. कामठी पेालीस ठाण्याच्या हद्दीतील शिरपूर येथील शेतकरी हटवार यांच्या बैलगाडीची दोन्ही लोखंडी चाक १५ दिवसांपूर्वी चोरीला गेले होते. दरम्यान, कामठी पोलीस गुरुवारी रात्री गस्तीवर असताना त्यांना तिन्ही आरोपी ही चाके एमएच-४०/एम-६९०८ क्रमांकाच्या छोट्या मालवाहू वाहनात ठेवून कामठी येथे विक्रीला नेत असताना आढळून आले. संशय बळावल्याने पोलिसांनी तिघांचीही कसून चौकशी केली. त्यात ती चाके चोरीची असल्याचे स्पष्ट होताच चाके जप्त करून तिघांना अटक केली. याप्रकरणी कामठी पेालिसांनी भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)***रेल्वेतून पडल्याने प्रवाशाचा मृत्यूकामठी : धावत्या रेल्वेतून तोल गेल्याने पडून गंभीर जखमी झालेल्या अनोळखी प्रवाशाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कामठी-कन्हानदरम्यानच्या उंटखाना परिसरात गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. हा प्रवासी मुंबई - हावडा एक्स्प्रेसने प्रवास करीत होता. तो कामठी - कन्हान दरम्यानच्या उंटखाना परिसरात धावत्या रेल्वेतून खाली कोसळला. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर प्रवाशाचे वय ४५ च्या आसपास आहे. याप्रकरणी कामठी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. ***जळाल्याने एकाचा मृत्यूकामठी : जळाल्याने गंभीर जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरी शिवारात नुकतीच घडली. ज्ञानेश्वर वासुदेव वाघमारे (४७) असे मृताचे नाव आहे. ज्ञानेश्वर हा खैरी शिवारातील शेतात असलेल्या घरी राहायचा. दरम्यान, घराला लागलेल्या आगीत तो गंभीररीत्या जखमी झाला. तो ८० टक्के जळाल्याने नागपूर येथील मेयो रुग्णलयात भरती केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कामठी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. ***