ए. राजा, कनिमोहीसह 19 जणांवर आरोपपत्र
By Admin | Updated: November 1, 2014 01:57 IST2014-11-01T01:57:24+5:302014-11-01T01:57:24+5:30
2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याबाबत माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांच्या पत्नी दयालू अम्माल, कन्या खा. कनिमोही तसेच अन्य 16 जणांवर आरोप निश्चित केले आहेत.

ए. राजा, कनिमोहीसह 19 जणांवर आरोपपत्र
नवी दिल्ली : सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याबाबत माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांच्या पत्नी दयालू अम्माल, कन्या खा. कनिमोही तसेच अन्य 16 जणांवर आरोप निश्चित केले आहेत.
2 जी घोटाळ्यासंबंधी एका प्रकरणी या सर्वानी काळ्या पैशाचा वापर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे या न्यायालयाने स्पष्ट केले. 12क् बी (गुन्हेगारी कट) आणि मनी लाँड्रिंग कायद्याच्या विविध कलमान्वये एकूण 19 जणांवर आरोप निश्चित करण्यात आले, त्यात नऊ कंपन्यांचाही समावेश आहे. सक्तवसुली प्रवर्तनालयाने (ईडी) या सर्वावर यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे.
डीबी उद्योग समूहाने 2क्क् कोटी रुपये कलाईग्नर टीव्ही प्रा. लिमिटेडकडे वळवताना काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी आढळून येते, असे विशेष सीबीआय न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी स्पष्ट केले.
गुन्ह्यात सहभाग असल्याचे सर्व आरोपींना मान्य आहे की, त्यांना सुनावणी करायची आहे, असा प्रश्न आरोप निश्चित केल्यानंतर न्यायाधीशांनी केला. त्यावर सर्वच आरोपींनी सुनावणी घेण्याला सहमती दर्शविली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4शाहीद उस्मान बलवा, विनोद गोयंका, कुसेगाव फ्रुटस् अँड व्हिजिटेबल्स लि., आसिफ बलवा, राजीव अग्रवाल, शरद कुमार, चित्रपट निर्माते करीम मोरानी आणि पी. अमृतम हे ए. राजा, कनिमोही आणि दयालू अम्माल यांच्याखेरीज अन्य आरोपी आहेत.
4दोषी आढळलेल्या राजा आणि इतर आरोपींना अधिकाधिक सात वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
42 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यासंबंधी या दुस:या प्रकरणातही राजा, कनिमोही यांच्यासह स्वान टेलिकॉमचे प्रवर्तक शाहीद उस्मान बलवा आणि विनोद गोयंका यांना खटल्याला सामोरे जावे लागेल.